Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election Results 2026: पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार

MLC Election Results 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक निकालांनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पुण्यात भाजपने निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असता....

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2026 | 04:28 PM
पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार

पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगर, अमरावतीत भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका!
  • शिवसेनेवरील आरोप बिनबुडाचे; भाजपने आधी स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे!
  • मित्रपक्षांवर आरोप करण्याऐवजी भाजपने जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात!
MLC Election Results 2026: विधान परिषद निवडणुकीत पुण्यातील दोनपैकी एक जागा शिवसेनेने लढवावी, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने दिलेला उमेदवार हा भाजपचा सदस्यही नव्हता. भाजपने पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या, निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर त्या उमेदवाराने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये निश्चितच उत्साह निर्माण केला असता. मात्र, बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीच या उमेदवाराला नाकारले. त्यामुळे या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. भाजपने जमिनीवर उतरून आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका बसला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाबाबत भाजपकडून शिवसेनेवर करण्यात येणारे आरोप बिनबुडाचे असून, तिन्ही पक्षांनी या निकालाचे आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले.

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप

पुणे शिक्षक मतदारसंघांपैकी एक जागा शिवसेनेला….

परांजपे म्हणाले की, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांपैकी एक जागा शिवसेनेला द्यावी, अशी पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चार जागांबाबत निर्णय झाले. मात्र, भाजपने पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर अशा तीन जागांवर उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने पुणे शिक्षक मतदारसंघातील आपले अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

पुण्यातील एका जागेवर शिवसेनेने निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पुण्यातील दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार नव्हते. त्यामुळे या जागांवर भाजपनेच दावा करणे कितपत योग्य होते, याचा विचार व्हायला हवा. भाजपने पक्षासाठी अनेक वर्षे काम केलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना त्या उमेदवाराशी आपलेपणा वाटला असता. मात्र, बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.

या उमेदवाराचा पराभव शिवसेनेने केला नाही, तर भाजपच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी त्याला नाकारले. भाजपने या नाराजीची कारणे समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आत्मपरीक्षण करावे. सर्व जागा आम्हीच लढवायच्या आणि सर्व जागा आम्हीच जिंकायच्या, ही भूमिका महायुतीसाठी योग्य नाही. भाजपने आपल्या मित्रपक्षांचा सन्मान राखला पाहिजे, असे परांजपे म्हणाले.

तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ते पुढे म्हणाले की, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे असताना भाजपशी संबंधित तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, चंद्रशेखर भुयार आणि डॉ. पवार हे उमेदवार प्रचारात सक्रिय होते. भाजपने बंडखोरांवर कारवाई केली असली, तरी निवडणुकीच्या काळात बंडखोर उमेदवार सक्रिय होते, असा आरोप परांजपे यांनी केला. असे असूनही शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले, हेही त्यांनी अधोरेखित केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत बोलताना परांजपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रशांत बंब यांनी नेमका कोणाचा प्रचार केला, याचा शोध भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

नागपूरमध्ये भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. निवडणुकीपूर्वी त्यांनी पाठिंबा दिला असला, तरी त्यांच्या बंडखोरीचा परिणाम निवडणुकीवर झाला. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने मित्रपक्षांवर पराभवाचे खापर फोडण्याऐवजी स्वतःच्या निवडणूक रणनीतीचे आणि अंतर्गत नाराजीचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला परांजपे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, पाच विरुद्ध शून्य असा निकाल अपेक्षित असताना महायुतीला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. आम्ही भाजपवर आरोप केले नाहीत आणि करणारही नाही. मात्र, भाजपनेही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.

Meenakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काय नाराजी आहे, उमेदवार निवडताना कोणत्या चुका झाल्या आणि निवडणुकीच्या काळात समन्वय कुठे कमी पडला, याचा आढावा भाजपने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून घ्यावा. मित्रपक्षांवर आरोप करणे सोपे आहे; मात्र पक्षांतर्गत असंतोषाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये भविष्यात अधिक चांगला समन्वय कसा राखता येईल, मित्रपक्षांना योग्य सन्मान कसा देता येईल आणि आगामी निवडणुकांमध्ये अशा चुका कशा टाळता येतील, यावर सर्वांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. महायुतीची एकजूट टिकवण्याची जबाबदारी सर्व मित्रपक्षांची असून, त्यासाठी परस्पर विश्वास, सन्मान आणि समन्वय आवश्यक आहे, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आनंद परांजपे यांनी भाजपवर कोणती टीका केली?

    Ans: पुण्यात भाजपने निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असता, असे म्हणत आनंद परांजपे यांनी भाजपच्या उमेदवार निवडीवर प्रश्न उपस्थित केले.

  • Que: महायुतीतील वादाचे कारण काय आहे?

    Ans: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीला दोन जागा मिळाल्या, तर तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात परस्परांवर आरोप सुरू झाले.

  • Que: आनंद परांजपे यांनी भाजपला काय आवाहन केले?

    Ans: मित्रपक्षांवर आरोप करण्याऐवजी भाजपने आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि महायुतीतील मित्रपक्षांना योग्य सन्मान द्यावा, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.

Web Title: Anand paranjpe slams bjp mahayuti election defeat pune amravati sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • BJP
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप
1

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
2

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
3

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका
4

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.