
आषाढी एकादशीसाठी पुणे सज्ज; शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी
उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागांचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही कागदपत्रे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कुंडयाल आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सुपूर्त करून पुढील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना दिल्या.
या प्रकल्पासाठी २५ जुलैपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह संबंधित यंत्रणांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली. याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
आता पुढील टप्प्यात ३ ऑगस्टपर्यंत उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर सोलापूर शहराला विठ्ठलाचे आशीर्वाद लाभल्याने उड्डाणपूल प्रकल्प मार्गी लागलाची भावना नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.