Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! देवदर्शनावरून परतताना भीषण दुर्घटना; सोलापुरात पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भीषण दुर्घटना घडली असून देवदर्शनावरून परतणारे भाविक घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 14, 2026 | 07:57 PM
Hit and Run Case : नागपुरात 'हिट अँड रन'; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Hit and Run Case : नागपुरात 'हिट अँड रन'; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Follow Us
Follow Us:

सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. तसेच विहिरीभोवती कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला, १२ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. विशेषतः चार महिला आणि चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहितीही समोर येत आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Web Title: Solapur malshiras pickup falls into well 14 devotees die tandulwadi accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Accident Case
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
2

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
4

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.