
Solapur-Mumbai Air Service Suspended Again: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
राज्य सरकारने पण यासाठी गॅप फंडिंग द्यायचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः लक्ष घालून 2 ऑगस्टपासून ही सेवा सुरू करून घेतली होती. पण एक महिना पण झाला नाही तोच कंपनीने हात वर केले आहेत. Solapur-Mumbai Air Service Suspended Again:
सोलापूर विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सप्टेंबर 2024 मध्ये झालं होतं. त्यानंतर सोलापूरहून वेगवेगळ्या शहरांना विमानसेवा सुरू झाली होती. सोलापूरकरांना वाटलं होतं की,आता कायमची सेवा सुरू राहील. पण दरवेळी काही ना काही कारणाने सेवा बंद पडते. प्रवाशांना मुंबईला जायचं असेल तर विमान हा सगळ्यात जलद पर्याय आहे. पण सेवा अशी मधेच बंद पडल्यामुळे लोकांचा विश्वासच उडत चालला आहे. तिकीट बुक करायचं आणि अचानक सेवा बंद झाली त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात.
सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत 9 सप्टेंबरला एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सोलापूर-मुंबई विमानसेवेबाबत काय निर्णय होतो याकडे सगळ्या सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे. सेवा पुन्हा सुरू होणार का? नाईट लँडिंगची सुविधा कधी मिळणार? इंधन दराचा प्रश्न कसा सुटणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बैठकीत मिळतील अशी आशा आहे.तूर्तास तरी सोलापूरकरांना मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एसटी, रेल्वे किंवा खासगी गाडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.