Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Municipal Election 2026: बंडखोरी शमविण्यासाठी अखेरपर्यंत नेत्यांची धावपळ; राजकारण जिंकलं; भावना हरल्या !

भाजपातील ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिल्ली, प्रभाकर जामगुंडे या दोघांनीही अखेर पक्षाचे आदेश पाळत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 04, 2026 | 10:02 AM
Solapur Civic Polls 2026

Solapur Civic Polls 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी
  • भाजपा पक्षामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या
  • उमेदवारी न मिळाल्याने आणि डावलली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
Solapur Municipal Election 2026: सोलापूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी, नाराज उमेदवारांची समजूत काढण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी तोडगे काढण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न झाले. बंडखोरी शमविण्यासाठी नेत्यांची धावपळ दिसून आली. विशेषतः भाजपात मोठी धावपळ पाहायला मिळाली. कमळासाठी माघार, पण डोळ्यांत अश्रू असे चित्र पाहायला मिळाले.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात ठरले दोषमुक्त

भाजपा पक्षामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती. उमेदवारी न मिळाल्याने आणि डावलली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतर पक्षांमध्ये देखील आहे.
अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त इतर उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटल्या. भाजपातील काही इच्छुकांनी उमेदवारी माघार घेतली. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले. नॉर्थकोटच्या आवारात हे भावनिक दृश्य पाहायला मिळाले.

काही प्रभागांत उमेदवारांची संख्या कमी असल्याने जागा बिनविरोध करण्याच्या उद्देशाने भाजपने प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. परिणामी सोलापूर महापालिकेतील एकही जागा बिनविरोध न होता सर्वच्या सर्व १०२ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगदीश पाटलांना अश्रू अनावर

दरम्यान माजी नगरसेवक जगदीश पाटील यानीही आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले, गेल्या ४० वर्षापासून एकनिष्ठवणे मी भाजपाशी जोडून आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने पक्षासाठी मी अर्ज माघारी घेतला. अन्याय झाला का असे विचारताच ते भावनिक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष;

कुमुद अंकारम यांची माघार

भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यानी शिवसेनेच्या कुमुद अंकारम यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, भाजपाने डावलल्याने कुमुद अंकाराम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना अर्ज माधारी घ्यायला लावण्यासाठी शुक्रवारी नॉर्थकोट येथे आमदार देवेंद्र कोठे स्वतः आले आणि अर्ज माघारी घ्यायला लावला.

माजी विरोधी पक्षनेते रिंगणाबाहेर

भाजपातील ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिल्ली, प्रभाकर जामगुंडे या दोघांनीही अखेर पक्षाचे आदेश पाळत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पक्षाने इतर नवीन उमेदवारास संधी दिली. या प्रभागात सुमारे १५ हजार तेलगू भाषिक मतदार आहेत. यामुळे पक्षाने ही चूक केली आहे. अशी प्रतिक्रिया दिड्डी यांनी दिली.

 

Web Title: Solapur municipal election 2026 solapur civic polls 2026 bjp internal rebellion solapur bjp news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Solapur Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.