(फोटो सौजन्य – Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तैपेई येथे सुरू झालेल्या जोलिन त्साईच्या बहुप्रतिक्षित जागतिक दौऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात तिचे प्रभावी सादरीकरण दिसून आले. तीन दिवसांच्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला दररोज रात्री अंदाजे ४०,००० प्रेक्षक आले, एकूण १,२०,००० पेक्षा जास्त चाहते होते. व्हायरल व्हिडिओमध्ये, जोलिन त्साई एका महाकाय सापाच्या डोक्यावर चढून स्टेजवर तिचा परफाॅर्मन्स देताना दिसून येते. सुमारे ३० मीटर लांबीचा हा साप खरा नसून सादरीकरणासाठी त्याला तयार करण्यात आले होते. पण त्याचे रुप पाहता त्याला हुबेहुब सापासारखे तयार केले होते जेणेकरुन पाहता क्षणीच लोकांना तो खरा असल्याचा भास व्हावा.
तैवानच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, जोलिन त्साई यांनी या वल्र्ड टूरच्या तयारीसाठी अंदाजे ९०० दशलक्ष तैवानी डॉलर्स किंवा अंदाजे २ अब्ज रुपये (अंदाजे २ अब्ज रुपये) खर्च केले. सापाव्यतिरिक्त, बैल, फुलपाखरू आणि डुक्कर यांच्या आकारातील हलत्या रचना देखील रंगमंचावर दिसल्या, ज्यामुळे संपूर्ण शो एका काल्पनिक जगात बदलला. जोलीन त्साई (Jolin Tsai) ही तैवानची एक प्रसिद्ध पाॅप डान्सर,गायिका आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या अनोख्या सादरीकरणासाठी ओळखली जाते. आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्या नावावर करुन ती तैवानमधील सर्वाधिक विकली जाणारी महिला रेकॉर्डिंग कलाकार आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






