Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur News : सोलापूरच्या १,४८३ कोटी रुपयांच्या जलआराखड्याला सध्या ब्रेक लागला आहे. यापूर्वी सुमारे ८५० कोटी रुपयांची असलेली योजना आता थेट १,४८३ कोटी रुपयांवर पोहोचल्याने खर्चात झालेल्या मोठ्या वाढीवर मुख्य सचिवांनी सवाल उपस्थित केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 08, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • जुन्या जलवाहिन्यांना नवे आयुष्य
  • १,४०० कोटींच्या खाली योजना शक्य नाही?
  • लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष
Solapur News :शहर प्रतिनिधी. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याला दीर्घकालीन बळ देण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या १,४८३ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी जलवितरण आराखड्याला अंतिम मंजुरीपूर्वीच ब्रेक लागला आहे. साडेआठशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनेचा खर्च थेट १,४०० ते १,५०० कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला, असा सवाल राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी उपस्थित केल्याने महापालिका प्रशासनाची खळबळ उडाली आहे.

गुरुवारी मुख्य सचिवांसमोर जलवितरण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी शहरातील सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था, जलवाहिन्यांचे जाळे, उपलब्ध पाणीसाठा आणि प्रस्तावित योजनेची माहिती दिली. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चाबाबत मुख्य सचिवांनी अधिक स्पष्टता मागितली. तसेच आराखड्यात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देत १३ सप्टेंबरपर्यंत सुधारित आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.

महापालिका प्रशासनाने मात्र जागतिक बँकेच्या नियमांनुसार प्रकल्पाची आखणी झाल्याने केवळ खर्च कमी करण्यासाठी निधी कमी करणे शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे. कामे आणि निधी कमी केल्यास प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुधारित आराखड्यानंतर पुन्हा सादरीकरण होणार असून, अंतिम मंजुरी कधी मिळते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मंजुरी लांबल्यास शहराच्या पाणीप्रश्नावर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

जुन्या जलवाहिन्यांना नवे आयुष्य

जुन्या जलवाहिन्या बदलणे, नव्या भागांत वितरण व्यवस्था उभारणे आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन संपूर्ण जलवितरण यंत्रणा सक्षम करणे, हा आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

१,४०० कोटींच्या खाली योजना शक्य नाही?

महापालिकेच्या मते जागतिक बँकेच्या करारानुसार प्रकल्पाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात कमी करता येणार नाही. मात्र वाढीव खर्चाला शासनाची मंजुरी मिळणार का, हा आता मुख्य प्रश्न आहे.

Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

जलआराखड्याला अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे. शहराच्या भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

यापूर्वीही सादरीकरण

राज्य मंत्रिमंडळाने हा प्रकल्प सार्वजनिक महत्त्वाचा व निकडीचा म्हणून मंजूर केला आहे. नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांच्यासमोरही यापूर्वी आराखड्याचे सादरीकरण झाले होते. आता मुख्य सचिवांच्या आक्षेपानंतर सुधारित आराखड्याला मंजुरी मिळते की योजना पुन्हा रखडते, याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे.

Web Title: Solapur news 1483 crore water plan stalled chief secretary questions how an 850 crore scheme ballooned to 1483 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:09 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
1

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
2

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
3

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
4

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.