Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

Solapur News: गोकुळ साखर कारखान्याकडे थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढत झाडावर चढून आंदोलन केले. अडीच कोटींच्या थकीत बिलावर मंगळवारी संयुक्त बैठक होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 08, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे मागील तीन वर्षांपासून थकीत असलेले ऊस बिल मिळावे, या मागणीसाठी ऊस पुरवठा शेतकरी संघटना आणि गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी आक्रमक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर पोहोचला. यावेळी काही शेतकरी झाडावर चढून बसल्याने आंदोलनाला नाट्यमय वळण मिळाले.

शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, गोकुळ साखर कारखान्याकडे २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीतील सुमारे अडीच कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत आहे. ही रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चार हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

दुपारी एकच्या सुमारास मोर्चा पूनम गेटवर पोहोचल्यानंतर शेतकरी संघर्ष समितीचे अॅड. अमोल पाटील, अरविंद घोडके यांच्यासह काही शेतकरी परिसरातील उंच झाडावर चढून बसले. थकीत ऊस बिलाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय झाडावरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

आश्वासनानंतर शेतकरी झाडावरून खाली

दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड आंदोलनस्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या वतीने दक्षिण सोलापूरचे प्रांताधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक साखर सहसंचालक आणि शेतकरी प्रतिनिधी यांची मंगळवारी दुपारी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

या आश्वासनानंतर झाडावर चढलेले शेतकरी दुपारी तीनच्या सुमारास खाली उतरले. मात्र, थकीत ऊस बिलाचा ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामातील सुमारे ५० कोटी रुपये मिळाले आहेत; मात्र मागील तीन वर्षांपासूनची अडीच कोटी रुपयांची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या रकमेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, थकीत ऊस बिल कधी मिळणार, याबाबत ठोस माहिती मिळाल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

थकीत बिलासाठी महिला शेतकरी भावुक

थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लोहगाव येथील महिला शेतकरी महादेवी बंडगर यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा सुमारे ४० टन ऊस गोकुळ साखर कारखान्याकडे गेला असून, अद्याप त्याचे बिल मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

कष्टाचे पैसे अडकून पडल्याने महादेवी बंडगर भावुक झाल्या. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांनी त्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर दिला. या प्रसंगामुळे आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरीही भावनिक झाले.

ऊस कारखान्याला देऊन बराच कालावधी उलटला, मात्र हक्काचे पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालवायचा, असा सवाल महादेवी बंडगर यांनी उपस्थित केला.

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

मंगळवारी प्रशासनासोबत संयुक्त बैठक

थकीत ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी प्रशासन, साखर विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड आणि तहसीलदार किरण जमदाडे यांच्या आश्वासनानंतर शेतकरी झाडावरून खाली उतरले. या बैठकीत थकीत बिलाची सद्यस्थिती, कारखाना प्रशासनाची भूमिका आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे कधी मिळणार, याबाबत चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Web Title: Solapur news gokul sugar factory pending sugarcane bill farmer protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • farmer
  • Solapur News

संबंधित बातम्या

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
3

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
4

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.