Washim Bike Theft Case
अश्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. लगेचच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील अधिकारी अंमलदार करीत असतांना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की, रिसोड परिसरात सदानंद टॉकीज जवळ आनंदी चौक रिसोड येथे राहणारा अंकुश विश्वनाथ राऊत हा दुचाकी कमी किंमतीत विक्रीकरीता रिसोड शहरात फिरत आहे.
सदर दुचाकी चोरीची असल्याची शक्यता आहे. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदारांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याप्रमाणे सिव्हील लाईन रोड रिसोड येथुन अंकुश विश्वनाथ राउत (३०, रा. सदानंद टॉकीजजवळ, आनंदी चौक, रिसोड) याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस करून तसेच कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याजवळून चोरी गेलेल्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या, चोरीचे वाहन पोलिस स्टेशन पो. स्टे रिसोड जि. वाशिम परिसरातून, पो. स्टे गोरेगाव जि. हिंगोली आदी ठिकाणावरून चोरी केली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोउपनि शेखर मास्कर, पोलिस अंमलदार गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, पोलिस अंमलदार अमोल इरतकर, चालक पोकाँ सुनील तायडे यांनी सहकार्य केले.
Ans: पोलिसांनी एकूण ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या.
Ans: अंकुश विश्वनाथ राऊत (वय ३०) याला ताब्यात घेतले.
Ans: रिसोड येथील सिव्हिल लाईन रोड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.






