Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur ZP Wari Planning: वारी सेवेत तडजोड नाही, वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा; जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांचे आदेश

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी २०२६ च्या नियोजनासाठी स्थायी समितीची बैठक पार पडली. वारी मार्गावर २४ तास रुग्णवाहिका, पाणी टँकर आणि रस्ते दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 10:00 PM
Solapur ZP Wari Planning

Solapur ZP Wari Planning

Follow Us
Follow Us:
  • आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज!
  • वारी सेवेत तडजोड नाही
  • वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा
सोलापूर: वारकरी संप्रदायाची सेवा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, आषाढी वारीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्थायी समितीच्या सभेत केले.

जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या सभेत आगामी आषाढी वारी २०२६ च्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने डागडुजी पूर्ण करणे, वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस व आरटीओ विभागाशी समन्वय ठेवणे, मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरते पाणी टँकर आणि स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

याशिवाय पालखी मार्गावर आरोग्य तपासणी शिबिरे, प्राथमिक उपचार केंद्रे आणि २४ तास रुग्णवाहिका तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारकऱ्यांच्या निवारा व विश्रांतीसाठी तात्पुरते शेड व मंडप उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणतीही अडचण तातडीने सोडवावी, असे स्पष्ट निर्देश अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले.

आषाढीपूर्वी विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन! ‘स्टोन पावडर’ तंत्रज्ञानाचा होणार वापर; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती

सभेत शासन निर्णयांची नोंद, विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जमा-खर्चास मंजुरी, जिल्हा ग्रामीण विकास निधीच्या प्रस्तावांना मान्यता तसेच मे २०२६ मधील विषय समित्यांच्या कार्यवृत्तांना मंजुरी देण्यात आली.

या सभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, सदस्या शांभवी कल्याणशेट्टी, बालाजी नरोटे, रमेश भांजे, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय

  • वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती
  • पिण्याच्या पाण्याची व टँकरची व्यवस्था
  • स्वच्छतागृह उभारणी
  • आरोग्य तपासणी शिबिरे व प्राथमिक उपचार केंद्रे
  • २४ तास रुग्णवाहिका सेवा
  • तात्पुरते निवारा शेड व विश्रांती मंडप
  • पोलीस व आरटीओ विभागाशी समन्वयातून वाहतूक नियोजन
  • वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा हा संदेश देत जिल्हा परिषद प्रशासनाने आषाढी वारीच्या तयारीला वेग दिला आहे.
Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! १६ जुलैपासून विठुरायाचे २४ तास अखंड दर्शन सुरू होणार

Web Title: Solapur zp president deepak vaidya reviews ashadhi wari 2026 planning and facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur
  • Solapur
  • Vitthal Rukmini Mandir

संबंधित बातम्या

विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन
1

विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन

Ashadhi Ekadashi : विठ्ठलभक्तीला स्वच्छतेची जोड; सुमीत ग्रूपचा पंढरपुरात स्तुत्य उपक्रम,चंद्रभागेच्या तिरी नियमित स्वच्छता
2

Ashadhi Ekadashi : विठ्ठलभक्तीला स्वच्छतेची जोड; सुमीत ग्रूपचा पंढरपुरात स्तुत्य उपक्रम,चंद्रभागेच्या तिरी नियमित स्वच्छता

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी
3

Ahilyanagar : आषाढीनिमित्त अहिल्यानगरच्या संत बुवाजी बुवा मंदिरात भक्तांची गर्दी

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
4

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.