Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात सौर क्रांती! २,७७१ सौर पंपांना मंजुरी; १,१०७ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुरू

जिल्ह्यात २२५ अर्ज नाकारण्यात आले आहे, संबंधित अर्ज नाकारण्यामागे प्रामुख्याने सातवा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे, भाडेपट्टीव घेतलेली शेती, तसेच शेती क्षेत्र अपात्र ठरणे कारणे पुढे आली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 13, 2026 | 12:39 PM
Solar Pump Scheme Kolhapur, Maharashtra Agriculture News,

Solar Pump Scheme Kolhapur, Maharashtra Agriculture News,

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात मोठा प्रतिसाद
  • वीज भारनियमन आणि डिझेलवरील खर्चापासून मुक्ती मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सौर कृषी पंपांकडे वाढ
  • योजनेत पंप बसवण्यासाठी अधिकृत कंपन्यांमधून निवड करणे आवश्यक
Kolhapur News: राज्यात शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज मिळावी, सिंचन खर्चात बचत व्हावी आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढावा, या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण ३,१४४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २,७७१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर अजर्जापैकी १,१०७ सौर कृषी पंप प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात बसवण्यात आले असून ते सध्या कार्यान्वित आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत असून, वीज भारनियमन आणि डिझेलवरील खर्चापासून मुक्ती मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सौर कृषी पंपांकडे वाढताना दिसत आहे. एकूण आलेल्या अर्जांपैकी सुमारे ८८ टक्क्यांहून अधिक अर्जाना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील योजनेची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय

 

मोठ्या प्रमाणावर पंप बसवण्याची प्रक्रिया

मंजूर झालेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणावर पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू असून, आधीच हजारहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या योजनेला विशेष प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर ग्रामीण विभाग । आणि ।।, गडहिंग्लज तसेच जयसिंगपूर विभागांत सर्वाधिक अर्ज, मंजुरी आणि प्रत्यक्ष बसवणी झाली आहे. ग्रामीण विभाग ॥ मध्ये ८२० अर्ज दाखल होऊन ७०८ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यापैकी ५६३ पंपांना मान्यता मिळाली असून मोठ्या प्रमाणावर पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अपात्र २२५ अर्ज नामंजूर

जिल्ह्यात २२५ अर्ज नाकारण्यात आले आहे, संबंधित अर्ज नाकारण्यामागे प्रामुख्याने सातवा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे, भाडेपट्टीव घेतलेली शेती, तसेच शेती क्षेत्र अपात्र ठरणे कारणे पुढे आली आहेत. पात्रतेचे निकष पूर्ण झाल्याने या अर्जाना मंजुरी देता आली नाही, अश माहिती देण्यात आली आहे.

कंपनीची निवड न केल्यामुळे १३७ अर्ज ‘पेंडिंग’ अवस्थेत

योजनेत पंप बसवण्यासाठी अधिकृत कंपन्यांमधून निवड करणे आवश्यक आहे. मात्र १३७ अर्जदारांनी अद्याप कंपनीची निवड न केल्यामुळे हे अर्ज ‘पेंडिंग’ अवस्थेत आहेत, संबंधित शेतकऱ्यांनी वेळेत कंपनी निवड केल्यास पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन पंप बसवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कोळसा वाहतुकीसाठी GPS अनिवार्य; प्रदूषण रोखण्यासाठी ‘चंद्रपूर मॉडेल’; शंभूराज देसाई यांची माहिती

मागेल त्याला सौर कृशी पंप योजनेतून शेतकऱ्यांना बेट, पारदर्शक आणि वेळेत लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, कोल्हापूर जिल्हाात १,१०७ सौर कृषी पंप प्रत्यक्ष शेतात बसवण्यात आले असून ही महत्त्वाची प्रगती आहे. उर्वरित मंजूर पंपांची बसधणीही वेगाने सुरू आहे. शेतक-यांनी कोणत्याही दलालांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रक्रियेतूनच अर्ज करावा.
– विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

शासनाच्या सौर कृषीपंप योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकूण १,१०७ सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत. महावितरणच्या कोल्हापूर मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांश अर्ज मंजूर झाले असून, सध्या २,१५० पंपांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सौर क्रांतीची आकडेवारी:

जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्याची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तपशील संख्या / प्रमाण
एकूण प्राप्त अर्ज ३,१४४
मंजूर अर्ज २,७७१ (८८%)
प्रत्यक्ष बसवलेले पंप १,१०७
अपात्र ठरलेले अर्ज २२५
प्रलंबित (कंपनी निवड बाकी) १३७

 

विभागीय कामगिरी (अर्ज व मंजुरी):

कोल्हापूर मंडळांतर्गत विविध विभागांत सौर पंपांच्या अर्जांची स्थिती समाधानकारक आहे:

गडहिंग्लज: ८२० अर्ज (७७४ मंजूर)

इचलकरंजी: ७०८ अर्ज (७२३ मंजूर – मागील प्रलंबितसह)

कोल्हापूर ग्रामीण १ व २: ७६० अर्ज (६४४ मंजूर)

कोल्हापूर शहरी व जयसिंगपूर: उर्वरित अर्ज.

२२५ अर्ज का नाकारले?

१. सातबारा उतारा: अर्जासोबत जोडलेल्या सातबारा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे.
२. शेती क्षेत्र: संबंधित शेती क्षेत्र योजनेच्या पात्रतेच्या निकषात न बसणे.
३. भाडेपट्टी: स्वतःच्या मालकीची शेती नसणे किंवा भाडेपट्टीवरील शेतीचे कागदपत्रे अपूर्ण असणे.

 

 

Web Title: Solar power boost for kolhapur farmers 1107 solar pumps installed under govt scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Agriculture News

संबंधित बातम्या

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!
1

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.