Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होते. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 10:30 AM
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana:

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana:

Follow Us
Follow Us:
  • १.४३ लाख शेतकऱ्यांना कृषी वाहिनीतून, तर ५८,६८४ शेतकऱ्यांना सौरपंपातून दिवसा वीज
  • ९८४ एकर जमिनीवर २४३ मेगावॅट क्षमतेचे ४३ प्रकल्प; ५०,३६० शेतकऱ्यांना फायदा
  • ८६१ एकर जमिनीवर १७५ मेगावॅट क्षमतेचे ४२ प्रकल्प; ५७,४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज
Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana:  देशाच्या ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असताना, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ऊर्जा स्वातंत्र्याचा’ नवा अध्याय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून लिहिला जात आहे. शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. या योजनेमुळे बारामती परिमंडळातील १ लक्ष ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ होत आहे. तर सौरपंपामुळे ५८ हजार ६८४ शेतकऱ्यांना हक्काची, शाश्वत, दिवसा व मोफत वीज उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे. या कृषी ग्राहकांना यापूर्वी आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात असे. रात्रीच्या वेळी शेतीपंप चालविण्यामुळे शेतकऱ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन, दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला; पोलिसांची अटी, शर्तीसह ‘ना हरकत’

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून सोलापूर मंडळात ९८४ एकर जमिनीवर २४३ मेगावॅट क्षमतेचे ४३ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ५० हजार ३६० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. सातारा मंडळात ८६१ एकर जमिनीवर १७५ मेगावॅट क्षमतेचे ४२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. बारामती ग्रामीण मंडळात ५५५ एकर जमिनीवर १११ मेगावॅट क्षमतेचे २२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

सौर ऊर्जेमुळे शेतीला नवी ऊर्जा

दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होते. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. विकेंद्रित सौर प्रकल्पांमुळे वीज निर्मिती आणि वापर यांच्यातील अंतर कमी करण्यासही हातभार लागतो. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि हरित ऊर्जेचा विस्तार ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही केवळ सौर ऊर्जा निर्मितीची योजना नसून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊन त्यांच्या जीवनात सुरक्षितता, सुविधा आणि आर्थिक स्थैर्य आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

बारामती परिमंडळात ५८ हजार सौर कृषी पंप आस्थापित

कुसुम ब, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून शाश्वत पाण्याचा स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ अश्वशक्तीचे पंप केवळ ५ ते १० टक्के लाभार्थाी हिस्सा भरून केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत बारामती परिमंडळात ५८ हजार ६८४ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. त्यात सोलापूर मंडळात ३८ हजार ६० , सातारा मंडळात ७ हजार ५९६, बारामती ग्रामीण मंडळात १३ हजार २८ सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

 

 

Web Title: Mukhyamantri saur krushi vahini yojana baramati satara solapur farmers get daytime electricity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Agriculture News
  • baramati
  • mahavitaran
  • Satara
  • Solapur

संबंधित बातम्या

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
1

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात
3

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
4

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.