Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हर हर महादेव’च्या गजराने सोमेश्वरनगरी दुमदुमली; दीड लाख भाविकांनी घेतले दर्शन

Someshwar Temple Darshan Shravan Last Monday: श्रावणातील शेवटच्या सोमवारी करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’च्या गजरात सुमारे दीड लाख शिवभक्तांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 07, 2026 | 08:09 PM
Someshwar Temple Darshan

Someshwar Temple Darshan

Follow Us
Follow Us:
  • श्रावणातील शेवटच्या सोमवारी मंदिरात भक्तीचा सागर
  • मध्यरात्रीपासून दर्शनासाठी रांगा
  • सोमेश्वर मंदिरात दीड लाख शिवभक्तांची गर्दी
सोमेश्वरनगर :ऊन – सावलीच्या खेळात व हर हर महादेव’च्या गजरात पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारचे औचित्य साधत करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध श्री. क्षेत्र सोमेश्वर मंदिरात लाखो शिवभक्तांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. मध्यरात्रीपासूनच स्थानिक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. गोपाळकाला, रविवार या सलग आलेल्या सुट्यामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे दीड लाख भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले.

Child Health : कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्

रविवारी (दि. 6) रोजी मध्यरात्री १२ वाजता राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या हस्ते महापूजा पार पडली. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, करंजेचे सरपंच भाऊसो हुंबरे, देवस्थानचे अध्यक्ष अनंत मोकाशी, सचिव सचिन भांडवलकर, विपुल भांडवलकर, विश्वस्त समिती सदस्य उपस्थित होते.

परंपरेप्रमाणे शेवटच्या सोमवारी सोमेश्वर देवस्थानच्या श्री सोमेश्वर देवाची पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. सकाळी नऊ वाजता विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर अंबावडे गावचे मानकरी तसेच सोमेश्वर परिसरातील मानकरी, खांदेकरी यांच्या उपस्थितीत पालखी वाजतगाजत मार्गस्थ झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी खोमणे माळावर आणण्यात आली. शेला पागोटे अर्पण करण्यात आले. यावेळी जळगाव सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द आदी गावांतील खोमणे मानकरी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत पालखी पुन्हा श्री सोमेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्यासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी ‘स्वरगंध’ प्रस्तुत ‘अभंगवाणी’ तसेच तेजस कदम यांचा ‘शिवआराधना’ कार्यक्रम पार पडला. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविक किशोर हिंगणे महाराज यांच्या वतीने भाविकांसाठी खिचडीचे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

बारामतीतील मयूर बोबडे, उद्योजक आर. एन. शिंदे, किरण आळंदीकर यांनी मंदिर परिसराला आकर्षक पुष्प-फळ सजावट केली. संध्याकाळी महाप्रसाद व्यवस्था प्रमोदकुमार गीते, उद्योजक नामदेवराव शिंगटे यांच्या वतीने केली गेली. रविवारी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व सोमेश्वर चालक-मालक वाहन संघटनेच्या वतीने महाप्रसाद वाटप झाले. होळ प्राथमिक आरोग्य केंद्र, साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने भाविकांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. बारामती आगाराच्या वतीने जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. मंदिर परिसर मिठाई, हार-फुले, खेळणी, पाळणे, विविध दुकानांनी गजबजून गेला होता. वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, उपनिरीक्षक राहुल साबळे, अझर मुलाणी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत . यात्रा काळात चांगला व्यवसाय झाल्याचे व्यवसायिकानी सांगितले.

कोळी शिवभक्तांची संख्या लक्षणीय

मुंबई, ठाणे, रायगड, कोकण या भागातून मोठ्या प्राणावर कोळी शिवभक्त दरवर्षी येत असतात. त्यांच्या मुक्कामाची सोय भक्तनिवासात केली गेली. त्यांनी आपले नवस या ठिकाणी पूर्ण केले.

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Web Title: Someshwar temple darshan shravan last monday baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • baramati
  • Lord Shiva
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
1

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
2

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.