
विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. देऊळगाव रसाळ येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीची दडी कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अमोल धनाजी रसाळ आणि मच्छिंद्र रामचंद्र रसाळ अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव रसाळ येथे विहिरीच्या खोदकामाचे काम सुरू होते. यावेळी विहिरीच्या बाजूची माती अचानक ढासळली. मातीचा मोठा ढिगारा थेट खोदकाम करणाऱ्या मजुरांवर कोसळल्याने ते त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत अमोल धनाजी रसाळ आणि मच्छिंद्र रामचंद्र रसाळ हे गंभीररीत्या मातीखाली अडकले. मात्र, या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विहिरीच्या खोदकामावेळी माती नेमकी कशामुळे ढासळली, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, घटनेची नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Ans: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे ही दुर्घटना घडली.
Ans: या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: विहिरीचे खोदकाम सुरू असताना बाजूची माती अचानक ढासळून मजुरांवर कोसळल्याने ही दुर्घटना घडली.