Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati: छत्रपती कारखान्याची ऊस दरात आघाडी; पहिली उचल ३५०१ रुपये प्रतिटन, सभासदांसह गेटकेनधारकांनाही समान दर

Chhatrapati Sugar Factory Sugarcane rate: भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल प्रतिटन ३५०१ रुपये जाहीर केली असून, सभासद आणि गेटकेनधारकांना समान दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 08:47 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ‘छत्रपती’चा ऊस उत्पादकांना दिलासा
  • पहिली उचल ३५०१ रुपये
  • कामगारांनाही १५ टक्के बोनस
बारामती :आर्थिक अडचणींवर मात करत कारखान्याला स्थैर्य मिळवून देण्याच्या प्रयत्नांत असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल प्रतिटन ३५०१ रुपये जाहीर केली आहे. सभासद आणि गेटकेनधारकांना समान दर देण्याचा निर्णय घेत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे परिसरातील साखर कारखान्यांच्या ऊस दराकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता इतर कारखान्यांच्या निर्णयांकडे वळल्या आहेत.

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी दराची घोषणा केली. यंदाचा गळीत हंगाम कारखान्यासाठी महत्त्वाचा असून, कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासद आणि ऊस उत्पादकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चालू हंगामात कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासदांनी तसेच गेटकेनधारकांनी आपला ऊस छत्रपती कारखान्याला द्यावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याचे कामकाज सक्षम करणे आणि शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळवून देणे, या दोन्ही बाबींवर भर दिला जात असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

वजन काट्याच्या अचूकतेवर भर

ऊस वजनातील पारदर्शकता हा मुद्दा पुढे करत कारखान्याने ‘वजन काटा चोख, पैसे रोख’ अशी भूमिका मांडली आहे. सभासद आणि गेटकेनधारकांच्या उसाचे वजन एकाच काट्यावर केले जाते, तसेच साखरेचे वजनही याच व्यवस्थेच्या माध्यमातून केले जाते, असे उपाध्यक्ष निंबाळकर यांनी सांगितले. एक टन म्हणजे अचूक एक हजार किलो वजन, या भूमिकेवर कारखान्याने भर दिला आहे.

कामगारांनाही बोनसची भेट

ऊस उत्पादकांसोबतच कारखान्यातील कामगारांसाठीही १५ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी १० टक्के बोनस दिवाळीच्या काळात आगाऊ स्वरूपात, तर उर्वरित पाच टक्के बोनस संक्रांतीच्या वेळी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य कारखान्याला मिळत असल्याचे निंबाळकर यांनी नमूद केले. माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष कैलास गावडे, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, अशोक पाटील, शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, अजित नरुटे, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, निलेश टिळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, बाळासाहेब कोळेकर, सुचेता सपकळ, हनुमंत घोळवे, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, विठ्ठलराव शिंगाडे, माधुरी राजपुरे, प्रशांत दराडे, सत्यवान चव्हाण आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Web Title: Chhatrapati sugar factory sugarcane rate 3501 rupees baramati pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • baramati
  • sugar cane
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
1

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
2

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव
3

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
4

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.