Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंदूर सणाच्या दिवशीच काळाचा घाला ! ‘सोन्या’ बैलाचा हृदयविकाराने मृत्यू

बावधन गावाला खिलार बैलांचा पारंपरिक वारसा आहे. येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाच्या रथयात्रेच्या निमित्ताने लाखो रुपयांची बैलांची खरेदी होत असते. तसेच येथील बैलपोळा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2026 | 12:20 PM
बेंदूर सणाच्या दिवशीच काळाचा घाला ! 'सोन्या' बैलाचा हृदयविकाराने मृत्यू

बेंदूर सणाच्या दिवशीच काळाचा घाला ! 'सोन्या' बैलाचा हृदयविकाराने मृत्यू

Follow Us
Follow Us:

सातारा : बेंदूर अर्थात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. हा उत्सव पाहण्यासाठी कर्नाटक, पुणे, तसेच राज्यातील विविध ठिकाणाहून साताऱ्यात हजारो बेलप्रेमी येत असतात. फटाकेही लावले जातात. मागील दोन वर्षांपासून फटाकेमुक्त बेंदूर साजरा करण्याचा निर्णय येथील बैलमालकांनी घेतला आहे. मात्र, सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथे बेंदूर सणाच्या मिरवणुकीत ‘सोन्या’ बैलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

बगाड यात्रेतील मानाचा बैल गमवल्याने कदम कुटुंब व ग्रामस्थ हळहळले. सूरज काका कदम यांच्या बैलाचे निधन झाल्याने बावधन गावावर शोककळा पसरली. सूरज काका आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या दावणीला ५ बैल आहेत. मोठा सोन्या, रामा, खंड्या, बलमा आणि बारका सोन्या अशी ५ बैल आहेत. बगाड यात्राकाळात काका कदम यांच्या घरासमोर मोठी सजावट करून बैल बांधले जातात. सकाळी कदम यांनी आपल्या ५ बैलांना अंघोळ घालून आकर्षक पध्दतीने सजविण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, भैरवनाथ मंदिरातील मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना बारक्या सोन्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. यामुळे काका कदम यांच्या कुटुंब, संपूर्ण खिलार प्रेमी, आणि बावधन गावावर शोककळा पसरली.

बावधन गावाला खिलार बैलांचा पारंपरिक वारसा

बावधन गावाला खिलार बैलांचा पारंपरिक वारसा आहे. येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाच्या रथयात्रेच्या निमित्ताने लाखो रुपयांची बैलांची खरेदी होत असते. तसेच येथील बैलपोळा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. सालाबातप्रमाणे यावर्षी देखील येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक वाद्याच्या तालात, गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करत फटाकेमुक्त बेंदूर साजरा केला. हा बेंदूर संपूर्ण तालुक्यासाठी आदर्शवत ठरला आहे.

बैलांची गावातून शाही मिरवणूक 

प्रत्येक शेतकरी आपल्या घरी असणाऱ्या बैलांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल करत असतात. वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्याला शेतीतील कामासाठी साथ देणारा एक प्रामाणिक साथीदार म्हणून बैलाकडे पहिले जाते. याचे ऋण म्हणून शेतकरी वर्षातून एकदा आपल्या बैलांची गावातून शाही मिरवणूक काढत असतात. यावेळी वर्षभर शेतात काम करून खाद्यावर औत ओढून खांदे थकले जातात. त्यामुळे बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी हळद, तेलाने बैलाची खांदमळणी केली जाते.

Palghar Coastline News : विकासाच्या नावाखाली विस्थापन मान्य नाही! सफाळे पश्चिम किनारपट्टीवर जनआंदोलन तीव्र; ग्रामस्थ आक्रमक

Web Title: Sonya the bull dies of a heart attack in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • heart attack
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
1

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
2

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

‘खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी, जिल्हा बँकेत पदासाठी नव्हे तर…’; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
4

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.