Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोथरुडकरांनो मेट्रो स्टेशनला जायचंय? गाडी कशाला बस वापरा; चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2025 | 11:34 AM
कोथरुडकरांनो मेट्रो स्टेशनला जायचंय? गाडी कशाला बस वापरा; चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

कोथरुडकरांनो मेट्रो स्टेशनला जायचंय? गाडी कशाला बस वापरा; चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे. पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले. लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठलआण्णा बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृशाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 2022 पासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे. सदर सेवा सुरु झाल्यापासून पुणेकरांचा वेळ आणि पैसा यामध्येही बचत होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकजण मेट्रोचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

त्यामुळे कोथरुडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरु करण्यात येत आहे. या सुविधेमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच, कोथरुड मधील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

सदर सेवा सोमवार ते शनिवार सुरु राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार, बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजानिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या पुणे मेट्रोच्या उद्देशास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निवडून दिला जातो. त्यामुळे लोकाभिमुख सेवेची शिकवण असल्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मेट्रोसाठी लास्ट माईल कनेक्टिविटी निर्माण करण्यासाठी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रिक्षा सेवा देखील सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली पहिली शटल बस सेवा राजाराम पूल- माळवे चौक, वनदेवी- कर्वेनगर, डहाणूकर- कर्वे पुतळा- करिश्मा चौक- एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ वेळेत सुरु असणार आहे. दरम्यान, सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, यासाठी अशा पद्धतीने मोफत शटल बससेवा सुरु करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमाचे कोथरुडमधून कौतुक होत आहे.

Web Title: Special bus service from home to metro station has been started for kothrudkars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • metro news
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
1

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
2

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
3

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
4

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.