Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

ग्राउंड स्टाफने विलंबाची वेगवेगळी आणि परस्परविरोधी कारणे दिली. काही प्रवाशांना सांगण्यात आले की दुबई विमानतळावर काही समस्या आहे, तर काहींना सांगण्यात आले की दिल्लीहून येणारे विमान अडकले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 04, 2026 | 05:05 PM
2026, SpiceJet SG 51 delayed Pune airport, Pune irport,

2026, SpiceJet SG 51 delayed Pune airport, Pune irport,

Follow Us
Follow Us:

Pune to Dubai flight delay: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एका विमानाला १ आणि २ जूनच्या रात्री विलंब झाल्यामुळे अनेक प्रवासी पुणे विमानतळावर नऊ तासांपेक्षा जास्त वेळ अडकून पडले. विमान कंपनीकडून संवादाचा पूर्ण अभाव होता आणि रात्रीच्या वेळी खाण्यापिण्याची किंवा पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

१ जून रोजी रात्री ८:५० वाजता सुटणारे विमान ‘एसजी ५१’ अखेर २ जून रोजी सकाळी अंदाजे ६:१५ वाजता रवाना झाले, म्हणजेच विमानाला नऊ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.मात्र, प्रवाशांना सुरुवातीच्या विलंबाची पूर्वकल्पना देण्यात आली होती आणि अगदी शेवटच्या क्षणी देखभालीची गरज भासल्यामुळे विमानाला आणखी विलंब झाला, असा दावा स्पाइसजेटने केला आहे.

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

याचा फटका प्रवाशांना बसला असून एका प्रवाशांनी सांगितले की,अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी दुबईला जात होतो. विमानतळावर पोहोचल्यावरच या विलंबाची माहिती मिळाली आणि विमान कंपनीने यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

रात्र जसजशी पुढे सरकत गेली, तसा प्रवाशांमधील गोंधळ अधिकच वाढला. ग्राउंड स्टाफने विलंबाची वेगवेगळी आणि परस्परविरोधी कारणे दिली. काही प्रवाशांना सांगण्यात आले की दुबई विमानतळावर काही समस्या आहे, तर काहींना सांगण्यात आले की दिल्लीहून येणारे विमान अडकले आहे. रात्री १ च्या सुमारास प्रवाशांना सांगण्यात आले की उड्डाण पहाटे ५ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.अखेर हे विमान सकाळी ६:१५ च्या सुमारास रवाना झाले.

Mahayuti internal disputes: महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

स्पाइसजेटच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी पुणे ते दुबई दरम्यान चालवली जाणारी स्पाइसजेटची फ्लाइट ‘एसजी ५१’ ही तिच्या आधीच्या फेरीतील तांत्रिक/ऑपरेशनल समस्येमुळे सुरुवातीला विलंबाने धावत होती. प्रवाशांना या विलंबाची माहिती सकाळीच देण्यात आली होती, जेणेकरून ते त्यानुसार विमानतळावर जाण्याचे नियोजन करू शकतील. त्यानंतर, अगदी शेवटच्या क्षणी देखभालीची गरज निर्माण झाल्यामुळे विमानाला आणखी विलंब झाला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे.

 

 

Web Title: Spicejet pune to dubai flight delay 2026 spicejet sg 51 delayed pune airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • flight
  • pune news

संबंधित बातम्या

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी
1

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार
2

सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
3

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष
4

CJP Pune Protest: ‘पेपर अभी झाकी है ‘ईव्हीएम’…’; प्रधानांचा राजीनामा अन् मेलोडी वाटत विद्यार्थ्यांचा जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.