Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surat ST Bus Accident: सुरतमध्ये एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक, ७ जणांचा मृत्यू

Surat ST Bus Accident: राज्याच्या सीमेवर अतिशय धक्कादायक घटना घडली असून गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 02, 2026 | 07:31 PM
Surat, Surat ST Bus Accident, ST Bus Accident, Bus Accident in Gujrat, Maharashtra State Transport,

Surat, Surat ST Bus Accident, ST Bus Accident, Bus Accident in Gujrat, Maharashtra State Transport,

Follow Us
Follow Us:

Surat ST Bus Accident: राज्याच्या सीमेवर अतिशय धक्कादायक घटना घडली असून गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या धक्कादायक घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य चालू आहे. तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली आहे. सुरतमधील बार्डोली येथील उवा या गावात हि घटना घडली आहे. महाराष्ट्र पासिंगच्या या दोनीही बस असल्याचे समजते. यातील एक एसटी धुळे-सुरत या मार्गावर धावणारी आहे. अतिशय भीषण अश्या या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळत आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही बसचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. तसेच या धडकेमुळे बसला आग देखील लागल्याचे दिसत आहे.

#Gujarat #Surat Two bus of #Maharashtra Passing #Accident #Video , Accident near Surat Bardoli pic.twitter.com/pjNw3XAj9i — DA (@DA33365) June 2, 2026

या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी स्थानिकांनी लगेचच धाव घेतली. स्थानिकांनी केलेल्या तत्परतेमुळे काही प्रवासाचा जीव वाचल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बार्डोली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. बसमधून मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर येत होते. अग्निशमन दलाने आग विजवण्यास सुरुवात केली असून शर्थीचे प्रयत्न सुरु केले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत व्यक्तींचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात इतका भीषण होता कि दोन्ही बसची टक्कर होताच एका बसच्या पुढच्या बाजूचा अक्षरशः चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले. तर, दुसरी बस जोरदार टकरीमुळे पलटली. दोन्ही बसला टकरीमुळे आग लागली. क्षणार्धात आग झपाट्याने वाढत गेल्याने काही प्रवासी त्यात अडकून पडले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Web Title: St bus accident in surat five dead and several injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Accident
  • ST Bus Accident
  • Surat

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.