Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus Fire : नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

नीरा-बारामती रस्त्यावर पणदरे खिंडजवळ बारामती आगाराच्या एसटी बसला भीषण आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. गुरुवारी सकाळी इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक धनंजय पवार यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवून दोन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 05:32 PM
नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Follow Us
Follow Us:
  • नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग
  • चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
  • बसमधील अग्निशामक यंत्रांची तपासणी व्हावी
सोमेश्वरनगर : नीरा बारामती रस्त्यावर पणदरे खिंड नजीक बारामती आगाराच्या बसला आग लागून बस जळून खाक झाली आहे. गुरुवार (दि.१८ ) रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान खामगळ पाटीच्या पुढे मयुरी हॉटेलजवळ ही घटना घडली. नीरा बाजूकडून ही बस बारामतीकडे जात असताना बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक धनंजय पवार दिसताच त्यांनी बस बाजूला घेत. आतमध्ये असलेल्या दोन प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले.

MSRTC News : अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम; १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटींची वाढ, रोज ३ कोटींचा फायदा

इंजिन ऑईलच्या गळतीमुळे क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. बसमध्ये असलेल्या अग्निशामक यंत्राने आग विझवण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. आगीत बसच्या काचा, आसने, इंटेरियर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत बसची पूर्ण बॉडी जळून खाक झाली होती. यामध्ये एस टी महामंडळाचे चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले. चालक धनंजय पवार यांनी या घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती

नीरा बारामती मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. मात्र घटना घडली त्यावेळी सुदैवाने केवळ दोन प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे आग लागताच त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी उतरविण्यात आले. बसमध्ये जर जास्त प्रवासी असते तर मोठा अनर्थ घडला असता.

बसमधील अग्निशामक यंत्रांची तपासणी व्हावी

बारामती आगारातील बहुतेक बस गाड्यांमधील अग्निशामक यंत्रे शोभेची आहेत. अनेक यंत्रांची पुनर्भरण तारीख उलटूनही त्यांचे पुनर्भरण करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व बसमधील अग्निशामक यंत्रांची पाहणी करून त्यांची देखभाल करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

MSRTC Fare Hike : एसटी प्रवाशांना दिलासा नाही! १०% हंगामी भाडेवाढीला आणखी महिनाभर मुदतवाढ

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी महामंडळाचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चालक धनंजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळीताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार देवकर करीत आहेत.

Web Title: St bus catches fire on nira baramati road near pandare khind loss of rs 40 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • baramati
  • Fire
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…
1

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
2

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद
3

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
4

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.