Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 2016 ते 2020 या कालावधीतील एक टक्का वेतनवाढीचा फरक, वाढीव महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता जुलै पेड इन ऑगस्टच्या पगारात देण्याचे आश्वासन दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 06:38 PM
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
  • वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
मुंबई : एसटीमधील सर्व कामगार संघटनांची प्रलंबित विविध मागण्यांबाबत सोमवारी (२२ जून) रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वार्षिक वेतनवाढ १ टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता, व वाढीव घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै पेड इन ऑगस्टच्या पगारात ही वाढ लागू करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, २९ जून रोजी राज्यभर होणारे धरणे अर्थात चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

दरम्यन, परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. सर्व श्रमिक संघटनांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच २०१६ ते २०२० दरम्यानचा एक टक्का वेतनवाढीचा दर प्रलंबित होता. तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनामध्ये देण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केले. दुसरीकडे प्रलंबित महागाई भत्ता आणि घर भाडे याची वाढ सुद्धा जुलै पेड इन ऑगस्टच्या पगारात देण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केले आहे. वाढीव महागाई भत्ता, घर भाडे आणि वेतनवाढ यातील जो फरक होता, तो जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन स्थगित करीत असल्याचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

एसटीही आमची मातृसंस्था…

विशेष म्हणजे या बैठकीत जी चर्चा आणि जे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उद्या अधिकृत करणार असून बैठकीत अतिशय सकारात्मक निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतले. उद्या कायदेशीर बाबी पूर्ण करून अधिकृत घोषणा झाल्यानंतर हा निर्णय मागे घेता येणार नाही. त्यामुळे विरोधाला विरोध म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. कामगार हा आमच्यासाठी केंद्रबिंदू आहे. आणि एसटी ही आमची मातृसंस्था आहे, असे सांगून अत्यंत चागला निर्णय घेण्यात आल्या बद्दल सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानण्यात आले.

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

Web Title: St workers demands accepted salary hike da hra increase andolan postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • ST Workers

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…
2

MSRTC NCMC Card: महिला अन् ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड असेल तरच मिळणार सवलतीचे तिकीट, अन्यथा…

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.