Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा; बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभे रिंगणसाठी बाजीराव विहीर समोर आला. उड्डाणपूलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्‍यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2025 | 11:56 AM
बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यमध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहिर परिसरात रिंगणाचा सोहळा वारकर्‍यांनी अनुभवला. रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्‍यांच क्षीण गेला.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह, देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या. तत्पूर्वी, दुपारी एक वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवला. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपापल्या सोहळ्यात सहभाग घेतला.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभे रिंगणसाठी बाजीराव विहीर समोर आला. उड्डाणपूलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्‍यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती. दुपारी चार वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यापूर्वी मैदानावर वारकर्‍यांनी फुगड्या, सुरपाट्यांच्या खेळासह, भारुडांचे कार्यक्रम सुरु केले होते. रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. तर सायंकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा रिंगणस्थळी आला.

यानंतर सेवेकर्‍यांनी टाळमृदंगाचा तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्‍यांच्या भोवतीने गोल रिंगण घातले. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरवात झाली. अश्वांनी तीन फेर्‍या पूर्ण करत रिंगण पूर्ण केले. रिंगण पूर्ण होताच अश्वांच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.

पालखी सोहळा वाखरी मुक्कामी विसावला

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला. शनिवारी वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर पालखी सोहळे आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करत आहेत.

Web Title: Standing and round arenas were held at bajirao vihir pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका
2

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
3

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.