Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangeshkar Hospital: मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढणार? ससूनचा अहवाल आल्यानंतर…; काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2025 | 09:49 PM
Mangeshkar Hospital: मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढणार? ससूनचा अहवाल आल्यानंतर…; काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. पुण्यात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात दोन चौकशी अहवाल प्राप्त झाले आहेत.

उद्या (दि. १५ मंगळवारी) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीच अहवाल प्राप्त होणार आहे. यासंदर्भात चाकणकर म्हणाल्या, ‘मृत महीला तनिषा भिसे हिची खासगी माहिती रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. याबाबत अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार देखील भिसे कुटुंबाकडून देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. पुढे कोणावरही असा प्रसंग ओढवू नये याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.’

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असल्याने धर्मदायुक्तांचा अहवाल असणे गरजेचे आहे. माता मृत्यू असल्याने माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असणे देखील गरजेचं आहे. तात्पुरत्या स्वरूपातील कोणतीही कारवाई होणार नाही, असे चाकणकर म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून विभागाने अहवाल मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज दि.११ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आला आहे.या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासन तातडीने कारवाई करावी अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.

Deenanath Mangeshkar Hospital: मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढणार? राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ परिसरात जमावबंदी

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण असते. यापार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर विविध राजकीय पक्ष तसेच संस्था व संघटनांकडून रुग्णालयाबद्दल विरोध केला जात आहे. रुग्णालयाच्या दारात आंदोलन केले जात आहे. आंदोलनात नावाला काळे फासणे, शाई फेकने, चिल्लर फेकण्याच्या घटना घडल्या. तर, रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास होतो. सोबतच परिसरात गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीही होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालय परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले.

 

https://youtu.be/XiFuXMN5D

Web Title: State comission for women rupali chakankar take action against mangeshkar hospital after sasson report pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • crime news
  • deenanath mangeshkar hospital
  • Pune
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
1

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
2

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
3

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
4

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.