राज्य महिला आयोगाची सरकारकडे महत्वाची मागणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र डिपॉझिट न भरल्याने त्या गर्भवती महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्या महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
राज्य महिला आयोगाची मागणी काय?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून विभागाने अहवाल मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज दि.११ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आला आहे.या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासन तातडीने कारवाई करावी अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून विभागाने अहवाल मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज दि.११ एप्रिल रोजी पुणे…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 11, 2025
‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ परिसरात जमावबंदी
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण असते. यापार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर विविध राजकीय पक्ष तसेच संस्था व संघटनांकडून रुग्णालयाबद्दल विरोध केला जात आहे. रुग्णालयाच्या दारात आंदोलन केले जात आहे. आंदोलनात नावाला काळे फासणे, शाई फेकने, चिल्लर फेकण्याच्या घटना घडल्या. तर, रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास होतो. सोबतच परिसरात गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीही होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालय परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले.
Pune News: ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ परिसरात जमावबंदी; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी काढले आदेश
महापालिकेचे खासगी रुग्णालयांना महत्वाचे निर्देश
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गभर्वती महिलेचा डिपॉझिट न भरल्याने उपचारांअभावी मृत्य झाला. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. पुणे महानगरपालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना डिपॉझिट घेऊ नये अशी नोटीस बजावली आहे. आधी रुग्णावर उपचार करावेत आणि मग त्यांच्याकडे पैसे मागावेत असे आदेश या नोटिसीमधून देण्यात आले आहेत.