सलगरे पोलिस चौकी नेमकी काय करत आहे?
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली सलगरे पोलीस चौकी ही तक्रारीच्या केंद्रबिंदूवर आहे. सलगरे पोलीस चौकी नेमकी काय करत आहे? सोमवार बाजाराच्या दिवशी सोडली, तर इतर दिवशी गच्च बेशुद्ध असते.तालुक्यातील अवैध वाहतूक, लाकूड वाहतूक, गोवंश वाहतूक आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या धंद्यांवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर कायदा आणि सुव्यवस्था फक्त नावापुरती राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. पोलिस फक्त सोमवार बाजाराच्या दिवशी बाहेर दिसतात. इतर दिवशी गच्च बेशुद्ध, परिणामी अवैध वाहतूक, लाकूड वाहतूक आणि गोवंश वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याची परिसरात चर्चा आहे. पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि काहींच्या वरदहस्तामुळे अवैध धंदे सुसूत्र चालत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याची नागरिकांमधून चर्चा सुरू आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध वाहतूक, लाकूड तस्करी व गोवंश वाहतूक उघडपणे सुरू असल्याची वस्तुस्थिती सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात ही वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत असताना त्यावर प्रभावी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध धंदे इतक्या उघडपणे सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र शांत का आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
– पांडुरंग पाटील, नेते शेतकरी विकास आघाडी






