Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेब्रुवारीच्या मध्यापासूनच सूर्य लागला तळपू; थंडीने घेतला काढता पाय

होळीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच सूर्य तळपू लागला असून, थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे पाराही चढला असून, ही उन्हाळ्याची चाहूल मानली जाते. दुपारी उन्ह चटके जाणवू लागले आहेत. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2024 | 12:49 PM
heatwave

heatwave

Follow Us
Follow Us:

नागपूर : होळीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच सूर्य तळपू लागला असून, थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे पाराही चढला असून, ही उन्हाळ्याची चाहूल मानली जाते. दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागतात. रात्रीची थंडीही बेपत्ता झाली आहे.

दिवसभर आणि रात्रीही पंखा सुरूच ठेवावा लागतो. सध्याच्या वातावरणाचा अंदाज घेऊन यंदा होळीपूर्वीच कुलर लावावे लागतील, अशी शक्यता नागपूरकर वर्तवित आहेत. काहींनी आतापासूनच कुलर सुरू करण्याची तयारी चालविली आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान 34.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा 1.6 अंशाने अधिक आहे. किमान तापमानही 19 अंशांवर आले असून, ते सरासरीपेक्षा 3 अंशांनी अधिक आहे.

सरबत, रसवंती सुरू

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहराच्या वेगवेगळ्या भागांत आतापासूनच कुलरच्या ताट्यांना लावल्या जाणाऱ्या वुडवूलच्या विक्रीची दुकाने लागणे सुरू झाले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथवरच ही दुकाने लागली आहेत. या सोबतच ठिकठिकाणी लिंबू सरबत, गारेगार मिल्क शेकची दुकानेही सजली आहेत. प्रत्येकच मार्गावर रसवंत्याही दिसत आहेत.

…तर यंदा उन्हाळा चांगलाच तळपणार

सूर्य तळपू लागताच कार्यक्रमांमधील गर्दी ओसरली. हजर असणारेही उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करताना दिसले. दुपारच्या वेळी काहीशी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वातावरणातील बदल लक्षात घेतल्यास यंदा उन्हाळा चांगलाच तळपणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Strong heat wave in nagpur winter season gone nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur
  • Sun heat
  • Sunstroke

संबंधित बातम्या

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
1

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
2

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
3

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.