
बारामतीतील आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. युवा मोर्चाच्या आंदोलनामुळेच सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या आंदोलनाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे सोलनकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद ही माहिती देण्याऐवजी हास्यकल्लोळ ठरल्याची टीका सोलनकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांकडून मुद्देसूद माहिती देण्याऐवजी परस्परविरोधी विधाने, टोलाबाजी तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यातच वेळ घालवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वाच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडण्याची संधी असतानाही विरोधकांवर टीका करण्यातच धन्यता मानण्यात आली. काही नेत्यांची विधाने एकमेकांशी विसंगत होती, तर अनेक प्रश्नांवर थेट उत्तर देणे टाळण्यात आल्याने उपस्थित पत्रकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे सोलनकर यांनी म्हटले आहे.
करमणुकीचा कार्यक्रम
सत्तेत सहभागी असतानाही जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस माहिती न देता केवळ राजकीय टोमणे आणि मिश्कील टिप्पणी केल्या. ही पत्रकार परिषद गंभीरतेऐवजी करमणुकीचा कार्यक्रम ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचेही सोलनकर यांनी नमूद केले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, सरचिटणीस स्वप्नील मोडक,अमर बुदगुडे, ओंकार कड्डे, युवती प्रमुख रसिका सणस, अबासाहेब थोरात, शुभम शिंगाडे, तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, संदीप केसकर, शिवानी चौधरी, विवेक साळुंखे, सुयोग सावंत,शुभम नानवरे,निलेश लांडगे, लखन गोळे रघु चौधर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.