Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा राज्यात सर्वाधिक उस, दुसऱ्या क्रमांकावर केळी; सुमारे 4 लाख 5 हजार हेक्टरवर उसाची लागवड

महसूल विभागाच्या ई-पीक (E-Pik) पाहणी ऑनलाइन (Online) नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी सुमारे चार लाख पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे. नगदी पिकांच्या लागवडीबरोबरच हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांचीदेखील आकडेवारी या उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 18, 2023 | 03:10 PM
यंदा राज्यात सर्वाधिक उस, दुसऱ्या क्रमांकावर केळी; सुमारे 4 लाख 5 हजार हेक्टरवर उसाची लागवड
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महसूल विभागाच्या ई-पीक (E-Pik) पाहणी ऑनलाइन (Online) नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी सुमारे चार लाख पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री पिकाची नोंदणी झाली आहे. नगदी पिकांच्या लागवडीबरोबरच हंगामी असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, कांदा, मका या पिकांचीदेखील आकडेवारी या उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून समजणे शक्य झाले आहे.

महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी या उपयोजनामध्ये करता येते. शेतकरीच या उपयोजनमध्ये पिकांची माहिती, तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांची छायाचित्रे अपलोड करू शकतात. जर संबंधित शेतकऱ्याने पिकांचे नोंद ई-पीक पाहणी उपयोजनमध्ये न केल्यास ती तलाठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षासाठी महसूल विभागाने केलेल्या ई-पीक पाहणी नोंदणीत आतापर्यंत राज्यात सर्वाधिक ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

केळी पिकाची एक लाख १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड

दरम्यान, ऊस या पिकाच्या लागवडीबरोबरच केळी या पिकाची एक लाख १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जळगाव या भागात आतापर्यंत केळी या पिकाची जास्तीत जास्त लागवड होत असे. आता मात्र जळगावसह राज्याच्या उर्वरित भागातही या पिकाचे क्षेत्र वाढू लागले आहे. संत्री या पिकाचे राज्यातील ८५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याबरोबरच डाळिंब पिकाची लागवड ६५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर झाली असून, हे पीक आता राज्यातील सर्वच भागात मूळ धरू लागले आहे. द्राक्षाची लागवड वाढली असून, सुमारे ६५ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर सध्या लागवड झाली आहे.

केवळ पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ऊस हे नगदी पीक घेण्याची जोरदार स्पर्धा होती. आता मात्र ही स्पर्धा राज्यभर पोहोचली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच विभागांत मिळून चार लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस या पिकाची नोंदणी झाली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आतादेखील ऊस या नगदी पिकाचे उत्पादन वाढू लागल्याचे दिसून आले आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणीनुसार ही लागवड ऑगस्टपासून गृहीत धरलेली आहे. पुढील वर्षी ऊस या नगदी पिकाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sugarcane is the highest in the state this year followed by banana sugarcane cultivation on about 4 lakh 5 thousand hectares nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 03:10 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • NAVARASHTRA
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
2

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
3

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
4

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.