Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य; बारामती पोटनिवडणुकीत इतिहास रचला

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 06:30 PM
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी

Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देशात सर्वाधिक म्हणजेच २ लाख १७,८७५ मताधिक्य देऊन बारामतीकरांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ८०६ मते मिळाली.

 

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यामध्ये अनेक उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये काँग्रेसची मनधरणी करण्यात यश आले. त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील निवडणूक लढवणार होते, मात्र कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. इतर अनेक उमेदवारांनी माघार घेतली होती.

मात्र २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले, यामध्ये अभिजीत बिचुकले, करुणा मुंडे यांच्यासह इतर उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. मात्र या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी व देशात सर्वाधिक मताधिक्याने विजय करण्यासाठी राष्ट्रवादीने मोठे प्रयत्न केले. कोणत्याही परिस्थितीत सुनेत्रा पवार २ लाख १७ हजार हून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र मतदानाची टक्केवारी घटल्याने सुनेत्रा पवार मताधिक्यांचा विक्रम करणार का?, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र झालेल्या मतदानामध्ये बारामतीकरांनी दिवंगत नेते अजितदादांवर श्रद्धा व्यक्त करत सुनेत्रा पवार यांना एकतर्फी निवडून दिले, केवळ एकतर्फी नव्हे तर देशात उच्चांकी मताधिक्याने निवडून देऊन अजितदादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या निवडणुकीत विरोधकांना फक्त दोन टक्केच मते मिळाली.

दरम्यान यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पवार विरोधात २८ ते ३२ टक्के मतदान होत होते, मात्र बारामती विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीमध्ये बारामतीकरांनी विरोधात फक्त २ टक्के मते दिली, उर्वरित ९८ टक्के मतदान सुनेत्रा पवार यांना देऊन बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा देशात विक्रम प्राप्त करून दिला. दरम्यान या निवडणूक निकालाचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले, मात्र निवडणूक मतमोजणी केंद्रासह केंद्राबाहेर पूर्णपणे शुकशुकाट होता. बारामती शहरातही विविध चौकांमध्ये शुकशुकाट दिसून आला. बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या समोर देखील तोच शुकशुकाट दिवसभर होता. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष केला नाही, अजित दादांच्या अपघाती निधनाचे दुःख आजही प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

हे सुद्धा वाचा : मिसिंग लिंकवर महागड्या गाडीचे स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!

Web Title: Sunetra pawar has won the baramati assembly by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • baramati
  • Election Result
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.