Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकायदेशीर वृक्षतोडीनंतर लाकडे गायब करणाऱ्या सुपरवायझरला दणका…

महापालिकेच्या नेहरुनगर हॉकी स्टेडियम येथील वृक्षांची वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि चार वृक्षांची बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत तोड करुन लाकडे गायब करणाऱ्या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला आयुक्त राजेश पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. या सुपरवायझरला निलंबित करुन त्याची विभागीय चौकशी सुरु केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 15, 2022 | 03:12 PM
बेकायदेशीर वृक्षतोडीनंतर लाकडे गायब करणाऱ्या सुपरवायझरला दणका…
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : महापालिकेच्या नेहरुनगर हॉकी स्टेडियम येथील वृक्षांची वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि चार वृक्षांची बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत तोड करुन लाकडे गायब करणाऱ्या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला आयुक्त राजेश पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. या सुपरवायझरला निलंबित करुन त्याची विभागीय चौकशी सुरु केली आहे. त्याशिवाय परवानगीव्यतिरिक्त तोडलेल्या वृक्षांच्या लाकडाची बाजारभावाप्रमाणे रक्कम निर्धारीत करुन सात दिवसात अहवाल मागविला आहे.

संतोष भिमाजी लांडगे असे निलंबित करुन विभागीय चौकशी सुरु केलेल्या असि. हॉर्टी सुपरवाझयरचे नाव आहे. लांडगे हे महापालिकेच्या उद्यान विभागात सुपरवाझयर या गट ‘क’च्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वृक्षसंवर्धन विषयक महत्वाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियम येथे स्थापत्य व क्रीडा विभागामार्फत क्रींडागणाच्या विस्तारीकरणाकरिता वृक्ष काढण्याची उद्यान विभागाकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीने 7 डिसेंबर 2021 रोजी 95 सुबाभुळ, 2 कडुलिंब, 3 पेल्टाफोरम, 1 निलगिरी, 6 बेहडा असे 107 वृक्ष पूर्ण काढण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जानेवारी 2022 अखेर धोकादायक 35 सुबाभुळ काढण्यात आले. उर्वरित वृक्ष क्रींडागणाच्या विस्तारीकरणाचे काम चालू झाल्यानंतर काढण्याचे प्रयोजन होते. त्यानुसार वृक्षतोडीबाबत कार्यवाही होणे आवश्यक होते.

लांडगे यांनी परस्पर, वरिष्ठांना पूर्वकल्पना न देता 58 सुबाभुळ, 2 कांचन, 2 कडुलिंब, 1 पिंपळ आणि दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त 1 कांचन, 2 कडुनिंब, 1 पिंपळ अशा 4 वृक्षांची खासगी यंत्रणेमार्फत बेकायदेशीर वृक्षतोड केली. त्याची लाकडे उद्यान विभागात जमा केली नसल्याचे 16 जून 2022 रोजी निदर्शनास आले. उद्यान विभागाचे उपायुक्त, प्रभारी उद्यान अधिक्षक यांनी याबाबत आयुक्तांना सांगितले. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. लांडगे यांनी अनाधिकाराने स्वत:च्या फायदा होण्याच्या दृष्टीने गंभीर अनियमितता केली. त्यामुळे कामकाजातील हलगर्जीपणा, बेजबाबदार वर्तनाबाबत उद्यान विभागामार्फत लांडगे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली.

[read_also content=”मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन… https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-shinde-and-deputy-chief-minister-fadnavis-visited-siddhivinayak-nrdm-304478.html”]

त्यावर लाकडे गुलाब पुष्प उद्यानात जमा केल्याचा खुलासा लांडगे यांनी केली. प्रत्यक्षात 2 जून 2022 रोजी तोडलेल्या झाडाची लाकडे मटेरियल इन, आउट रजिस्टरमध्ये नोंद केल्याचे आढळून आले नाही. लांडगे यांचा खुलासा संयुक्त नसून वस्तुस्थितीला धरुन नसल्याने दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी शिस्तभंगविषयक कारवाईची शिफारस केली. लांडगे हे प्रत्यक्ष सेवेत राहिल्यास अडचणींची परिस्थिती निर्माण होण्यास, तपासात अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. उपलब्ध पुराव्यात फेरफार करण्यास कोणताही वाव मिळणार नाही, यासाठी संतोष लांडगे यांना सेवा निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. याशिवाय लांडगे यांनी परवानगीव्यतिरिक्त तोडलेल्या वृक्षांच्या लाकडाची आजच्या बाजारभावाप्रमाणे होणा-या एकूण रक्कमेची परिगणना करावी. त्याची रक्कम निर्धारीत करुन त्यासह अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश उद्यान विभागप्रमुखांना दिले आहेत.

Web Title: Supervisor who disappears timber after illegal logging nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 03:12 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • mahesh landge
  • NAVARASHTRA
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’
2

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
3

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश
4

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.