Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार? सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रीया

उशिरा का होईना डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचे मी स्वागत करते. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2025 | 12:56 PM
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार? सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रीया

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार? सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/ निलेश राऊत : गर्भवती तनिष भिसे मृत्यूप्रकरणातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह, या घटनेसाठी जे जबाबदार असतील त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. दरम्यान या घटनेनंतर उशिरा का होईना डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचे मी स्वागत करते. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील अहवाल म्हणजे हा रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते दुर्दैवी आहे. परंतु, महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही हीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही याबाबत न्यायालयात देखील धाव घेतली आहे. हा काही राजकीय विषय नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी जे वक्तव्य केले होते, त्याबाबत माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की मुख्यमंत्री आपल्या लेकीला न्याय देतील. मात्र पहिल्या दिवशी त्यांनी जे वक्तव्य केले व आज त्यांचे जे वक्तव्य आहे यात मोठा फरक आहे हे मोठे दुर्दैवी आहे. आता अहवालामध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर फोकस राहिला पाहिजे, कुठला अहवाल काय म्हणतो यात अडकायला नको, असेही सुळे म्हणाल्या.

राज्यातील यवतमाळ येथील पाणी टंचाई बाबत बोलताना सुळे म्हणाल्या, पाणीटंचाई ही दुर्दैवी असून, जलजीवन मिशन नावाचा उपक्रम पूर्ण देशात राबवला गेला. पण राज्यात डबल इंजिनचं सरकार असून देखील पाण्याची अशी परिस्थिती आहे ही बाब खेदजनक आहे. पाण्याचं नियोजन ज्यावेळी होतं त्यावेळी सरकारने हे नियोजन योग्य का केले नाही. लोक आज मर मरत आहेत हे राज्यकर्त्यांच अपयश आहे.

बीडमध्ये नक्की काय सुरू आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न असल्याचे सुळे यांनी सांगून येथे पोलिसांचे भय कोणाला राहिले नाही. बीडमध्ये दहशत नेमकी कुणाची आहे. बीडमध्ये वर्दीला देखील कुणी घाबरत नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी, हे सगळं गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे याचा मला आनंद आहे. कुटुंब एकत्र झाले आहे त्याचा आनंद साजरा करू द्या. हा सुस्कृत महाराष्ट्र आहे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा हीच आपली संस्कृती असल्याचे सुळे यांनी सांगितले. संग्राम थोपटे यांचा आज मेळावा आहे, हा मेळावा होऊ द्या त्यांनी काय करावे हे आपण कशाला ठरवायच, त्यांचा निर्णय येऊ द्या त्यांचा निर्णय आल्यावर मी यावर बोलीन असेही त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडू मेळाव्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, काल बच्चू कडूंचा मला फोन आला होता आमचं बोलणं होऊ शकलं नाही. त्यामुळे प्रथम त्यांचं काय म्हणणं आहे हे मी समजून घेईन. अशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग आणि चर्चा झालीच पाहिजे, असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Supriya sule has responded to the talk of uddhav thackeray and raj thackeray coming together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • cmomaharashtra
  • crime news
  • deenanath mangeshkar hospital
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…
1

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
2

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले
4

साताऱ्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरातून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.