Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरत – चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मत

सूरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2022 | 05:54 PM
सूरत – चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मत
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सूरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

नियोजन भवन सोलापूर येथे सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाणपूल संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, सूरत चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. शेत पिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील, याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलां संदर्भात शासकीय जागांबाबत तात्काळ मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भूसंपादनाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १८ गावे, उत्तर सोलापुर तालुक्यातील ८ गावे, दक्षिण सोलापुरातील १६ गावे व अक्कलकोट तालुक्यातील १७ गावे अशी एकूण ५९ गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची चार पथके तयार करून रोव्हरच्या साह्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जाग्यावरच शेतकऱ्या समक्ष पंचनामे देखील करण्यात आले आहेत. सूरत-चेन्नई भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

१०.४५० किमीचे दोन उड्डाणपूल होणार

सोलापूर शहरातील जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक व जुना बोरमणी नाका ते मोरारका बंगलापर्यंत दोन उड्डाणपूल होणार असून, हे दोन उड्डाणपूल १०. ४५० किमीचे होणार आहेत. या अंतर्गत येणाऱ्या ११ शासकीय विभागांच्या जागा तात्काळ मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर लवकर कार्यवाही व्हावी, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Surat chennai highway contributed to the development of the district guardian minister radhakrishna vikhe patils opinion nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 05:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Radhakrushn Vikhe Patil

संबंधित बातम्या

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ
1

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ
2

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
3

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
4

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.