Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी दिले प्रतिउत्तर, जागावाटपासाठी भाजपचे नेते मातोश्रीवर….

सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. अश्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2024 | 11:59 AM
नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंनी दिले प्रतिउत्तर, जागावाटपासाठी भाजपचे नेते मातोश्रीवर….
Follow Us
Follow Us:

सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. अश्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. चंद्रपूरमध्ये काल नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेला ठाकरे गटाकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. जागावाटपासाठी भाजपचे नेते मातोश्रीच्या दारात उभे राहायचे. पण तेच नेते टेंभी नाक्यावर कधी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही, त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? असे म्हणत सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.

नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रतिउत्तर देत सुषमा अंधारे म्हणाल्या, गोंदियाच्या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते, शिवसेना शिंदेंची आहे तर खरे शिवसेनाप्रमुख असल्याची मुक्ताफळे नेहमीप्रमाणे उधळलेली. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली पाहिजे, जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते तेव्हा जागावाटपाची चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते मातोश्रीवर यायचे. तेव्हापासून उद्धव ठाकरे पाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चेसाठी भाजपचे नेते मातोश्रीचे उंबरे झिजवायचे. बाळासाहेबांच्या काळात अडवाणी असतील किंवा अटलजी असतील, गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील, तसेच उद्धव ठाकरेंच्या काळात मोदी असतील किंवा शाह असतील हे मुंबईत मातोश्रीवर यायचे. आम्हाला किती जागा देताय यासाठी अत्यंत याचिकाकासारखे मातोश्रीच्या दरामध्ये उभे राहायचे. त्यावेळी आम्ही याच अटीवरतुमच्यासोबत युती करणार होतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जेव्हापासून आमच्यातील एक गॅंग फितूर झाली आहे. त्या फितुराला एकदाही शक्य झाले नाही टेंभी नाक्यावर मोदी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलावले. उलट टेंभी नाक्यातील माणूस मुजरे करत दिल्लीला गेला. याच्यातूनच खरी शिवसेना कोणाची आहे हे स्पष्ट होतं, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Web Title: Sushma andharan responded to narendra modis criticism bjp leader matoshreevar for seat sharing loksabha election nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Election2024
  • Narendr Modi
  • shivsena
  • Sushama Andhare

संबंधित बातम्या

‘घंट्याचा निष्ठावान! ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून..,’ निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका
1

‘घंट्याचा निष्ठावान! ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून..,’ निलेश राणेंची वैभव नाईकांवर सडकून टिका

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
2

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार
3

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
4

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.