Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेडपीचे सीईओ स्वामींना निलंबित करा; कास्ट्राईब संघटनेचे राजाध्यक्ष कांबळे यांची मागणी

ऑगस्ट २०२२ अखेर आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद सोलापूर येथे रुजू झालेल्या शिक्षकांना त्वरित पदस्थापना देण्यात यावी व पदस्थापना देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य कास्ट्राईब शिक्षक महासघांचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 04, 2022 | 07:11 PM
झेडपीचे सीईओ स्वामींना निलंबित करा; कास्ट्राईब संघटनेचे राजाध्यक्ष कांबळे यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : ऑगस्ट २०२२ अखेर आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद सोलापूर येथे रुजू झालेल्या शिक्षकांना त्वरित पदस्थापना देण्यात यावी व पदस्थापना देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य कास्ट्राईब शिक्षक महासघांचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली.

कांबळे यांनी शुक्रवारी सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आंतरजिल्हा बदलीवरून रूजू होत असणाऱ्या शिक्षकांचे प्रलंबित पगार, महागाई फरक त्वरीत अदा करण्यात यावे. तसेच करमाळा पंचायत समितीतील उपशिक्षक स्वर्गवासी हरी काळे यांच्या कुटुंबीयांना सर्व आर्थिक लाभ देण्यात व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्यात यावी. माढा तालुक्यातील मानेगाव येथील संजीवनी विद्यालयातील लिपिक कौस्तुभ काळे यांना नियुक्ती दिनांक २२/१०/२०१२ पासून अनुसूचित जमाती (एस.टी) कनिष्ठ लिपिक म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली.

तसेच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त देणे व त्यांचा पगार करणे याबाबत सीईओ दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी लोहार यांनी जाणीवपूर्वक विलंब केला आहे. शिक्षकांच्या अवेळी बदल्या करून पात्र शिक्षकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व शिक्षकांचा पगार या दोघांच्या पगारीतून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही कांबळे यांनी यावेळी केली.

संपतीची चौकशी करा…

सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदमधील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाला सादर केलेल्या माता व दायित्व याची प्रत्यक्ष गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी व उत्पन्नापेक्षा अधिकचे स्त्रोत आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशा अधिकाऱ्यांना पुनर्स्थापना देताना महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात देण्यात यावी. यामुळे महाराष्ट्र राज्यात शिक्षकांचा आर्थिक छळ होणार नाही व एक आदर्श प्रशासन निर्माण होईल.

याही मांडल्या मागण्या…

समाजशास्त्र विषय नकार मंजूर करून त्यांचे तात्काळ समायोजन करावे. दर महिन्याचे वेतन राज्य शासनाच्या सूचनेनुसार एक तारखेला करण्यात यावे. केंद्रप्रमुख पदोत्रती तात्काळ करावी. प्रलंबित मेडिकल बिले तातडीने मंजूर करण्यात यावी. प्रलंबित वरीष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी सदर बदली प्रक्रियेत सहकार्य. विलंब होणार नाही याची काळजी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेनंतर त्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या शाळांवर होण्याची सक्ती करावी. विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा मागण्या यावेळी कांबळे यांनी मांडल्या आहेत.

Web Title: Suspend zp ceo swamy the demand of kamble the king president of kastraib organization nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2022 | 06:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Dilip Swami
  • Eknath Shinde
  • Zp Solapur

संबंधित बातम्या

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
1

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले
2

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
3

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
4

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.