Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : “पहलगाम पिडितांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा”, श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला खडसावले

काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावं. संसद अधिवेशनाची मागणी करण्याआधी काँग्रेसने तात्काळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलवावे आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 29, 2025 | 06:58 PM
"पहलगाम पिडितांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा", श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला खडसावले (फोटो सौजन्य-X)

"पहलगाम पिडितांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा", श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला खडसावले (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करण्यापूर्वी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलावून ज्या काँग्रेस नेत्यांनी पहलगाम पीडितांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत भूमिका जाहीर करावी, अशा शब्दांत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला खडसावले. मुंबईत ते बोलत होते.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावं. संसद अधिवेशनाची मागणी करण्याआधी काँग्रेसने तात्काळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलवावे आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. विजय वडेट्टीवार यांनी पीडितांच्या अनुभवांवर शंका घेतली, कर्नाटकातील काँग्रेस मंत्री आर. बी. थिम्मापूर आणि सिद्धरामय्या यांनी धर्म विचारुन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला नाकारलं, सैफुद्दीन सोज यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवण्याचं सुचवलं आणि तारीक हमीद कर्रा यांनी पाकिस्तानसोबत संवादाची मागणी केली, ही केवळ वैयक्तिक मतं नाहीत, तर एक धोकादायक आणि देशविरोधी विचारसरणीचे लक्षण आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

रॉबर्ट वड्रा यांनी केलेलं वक्तव्य की “आतंकवाद्यांनी भारतातील मुस्लीमांवरील कथित अन्यायामुळे हल्ला केला” हे पूर्णपणे निंदनीय आणि निषेधार्ह आहे. काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्यं केवळ राजकीय अपरिपक्वता नाही तर पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांच्या विधवा पत्नी आणि अनाथांच्या वेदनांचा उपहास करण्यासारखे अमानवी कृत्य आहे. काँग्रेसने स्पष्ट सांगावं की ते दहशतवाद्यांच्या हल्ल्याने पिडीत झालेल्या निर्दोष नागरिकांच्या बाजूने आहे की आपल्या नेत्यांच्या ज्यांनी आतंकवाद्यांचं समर्थन केलं? असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या राष्ट्रीय संकटात देशाला एक ठाम आणि एकत्रित भूमिका हवी आहे. दिशाभूल करणारी, तुष्टीकरणावर आधारित भूमिका नको, असे खासदार डॉ. शिंदे यांनी काँग्रेस नेत्यांना खडसावले.

Bhiwandi :पहलगाम हल्ल्याविरोधात भिवंडीत शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन

Web Title: Take action against leaders who disrespect pahalgam victims shrikant shinde hits out at congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pahalgam Terror Attack
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.