Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताम्हिणी घाट खचला! २ ते ५ ऑगस्टपर्यत वाहतुकीसाठी मार्ग बंद

पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश काढले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 02, 2024 | 03:35 PM
ताम्हिणी घाट खचला! २ ते ५ ऑगस्टपर्यत वाहतुकीसाठी मार्ग बंद
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कारणासाठी 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे ते मालेगाव ते पुणे रायगड जिल्हा हद्दीपर्यंत रुंदीकरणाचे काम चालू असून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६३/००० या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे महामार्ग पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. या दुर्घटनेमुळे हॉटेल पिकनिक येथील फॅमिली हॉटेलमधील एका व्यक्तीचा मृत्यू आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना देखील यावेळी घडली होती.

पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथे एक ऑगस्ट रोजी पुणे ताम्हिणी क्रमांक ७५३ वर साखळी क्रमांक ६१/६५० ते ६१/६८० मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेली असून रस्ता पूर्णपणे खचला आहे हा घाट वनपरिक्षेत्रात असून पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे आणि रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू असून आत्ता या महामार्गावरील वाहतूक एका बाजूने चालू ठेवलेली आहे. परंतु पुढील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता अजून खचण्याची आणि अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या महामार्गावरील नियमित वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे.

रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यजा करतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील आधारवाडी आणि डोंगरवाडी गाव येथील भागात खटलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी २ ऑगस्ट २०२४ पासून ५ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातून पुण्याला जाणारा वरंधघाट आधीच बंद आहे. त्यामुळे पोलादपूर महाड माणगाव तसेच रोहा आणि श्रीवर्धन विभागातील नागरिकांना पुणे येथे जाण्यासाठी एकमेव असलेला ताम्हणी घाट २ ऑगस्टपासून ५ ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने या परिसरातील नागरिकांनी कोणत्या रस्त्याने जायचे असा सवाल राज्य शासनाला केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे घाट परिसरातील रस्ते बंद होतात याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी का करीत नाहीत असा सवाल वाहतूकदार संघटनेकडून विचारला जात आहे.

Web Title: Tamhini ghat road will be closed from 2nd august to 5th august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा
1

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा
2

Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा

Pune Crime: पुण्यात थरार! देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, जागीच मृत्यू
3

Pune Crime: पुण्यात थरार! देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, जागीच मृत्यू

Maharashtra Heatwave : कुठे ४७ अंशांची आग, तर कुठे पावसाची सर! महाराष्ट्रात निसर्गाचा लपंडाव 
4

Maharashtra Heatwave : कुठे ४७ अंशांची आग, तर कुठे पावसाची सर! महाराष्ट्रात निसर्गाचा लपंडाव 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.