Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Water Supply: श्रीमंत महापालिका पण पाण्याचा दुष्काळ! दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण; टँकर लॉबीचा विळखा

शहराची तहान भागवण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच आहे

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2026 | 01:52 PM
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी ठेवा साठवून; उद्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी ठेवा साठवून; उद्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Follow Us
Follow Us:
  • शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणीपुरवठा,  गृहिणी आणि नोकरदारांचे हाल
  • वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी वितरणाचे जाळे विस्तारण्यात प्रशासनाला अपयश
  • भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पांना होणारा विलंब हे मुख्य कारण
  • २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते
PCMC Water Supply:  श्रीमंत कामगारनगरी आणि आताची झळाळती ‘मेट्रो सिटी’… पिंपरी-चिंचवड शहराच्या नावासमोर विशेषणांची कमतरता नाही. आशिया खंडातील सर्वात नगरपालिका असा लौकिक मिळवलेले हे शहर आज विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालत आहे. मात्र, या चकाकीच्या पडद्यामागे एक भीषण वास्तव दडले आहे. गेल्या साडेसहा वर्षांपासून या ‘बेस्ट सिटी’तील नागरिक थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करत असून, दिवसाआड पाणीपुरवठ्याचे ‘कोरडे’ संकट शहराच्या पाचवीलाच पुजले आहे.

 

प्रशासकीय अनास्था की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ?

एकेकाळी पवना नदीच्या काठावर वसलेल्या चार ग्रामपंचायतींचे रूपांतर आज एका महाकाय महानगरात झाले आहे. मात्र, शहराचा विस्तार ज्या वेगाने झाला, त्या वेगाने पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. धक्कादायक वास्तव हे आहे की, शहरात पाणी नाही असे नाही, तर उपलब्ध पाणी घराघरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन ‘राजकीय’ आणि ‘तांत्रिक’ चक्रव्यूहात अडकले आहे.

Pune News: पुण्यात माणुसकीला काळीमा! कर्जदार दांपत्याला बँक एजंटकडून लाथाबुक्क्यां

प्रकल्पांची संथ गती आणि रखडलेल्या योजना

शहराची तहान भागवण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच आहे

 

पवना जलवाहिनीः मावळमधील गोळीबाराचा ‘रक्तरंजित’ इतिहास

पिंपरी-चिंचवडच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख ‘मावळ गोळीबाराच्या’ त्या काळ्या दिवसाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. २०११ मध्ये थेट जलवाहिनी आणण्याच्या प्रयत्नात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आणि प्रकल्पाला स्थगिती मिळाली.

तब्बल १२ वर्षांनंतर २०२३ मध्ये ही स्थगिती उठवण्यात आली असली, तरी राजकारणाचे धुमारे आजही या प्रकल्पावर साचले आहेत.

नेत्यांची दुटप्पी भूमिका, मात्र नागरिकांचे हाल

विशेष म्हणजे, मावळचे नेते या प्रकल्पाला विरोध करतात, तर पिंपरीचे नेते समर्थनाची भूमिका घेतात. पक्षांची ही दुटप्पी भूमिका शहराला तहानेने व्याकुळ करत आहे. श्रीमंत महापालिका असूनही निधीसाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसावे लागणे, हे शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी दुर्दैवी आहे.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत तुफान स्पर्धा; पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ नावाचीही जोरदा

महापौर काय म्हणतात ?

66 श्पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय संवेदनशील आहे. आम्ही बाधितांशी चर्चा -करून मार्ग काढू, भामा आसखेडच्या कामासाठी नवीन निविदा काढल्या आहेत. हे काम पूर्ण होताच शहरवासीयांना दररोज पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे.१
रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड

भामा आसखेड योजना २०१४ मध्ये सुरू झालेले काम २०२४ उजाडले तरी अपूर्णच आहे. ठेकेदाराची हकालपट्टी आणि भूसंपादनाचे अडथळे यामुळे ३० टक्के काम आजही अधांतरी आहे.

आंद्रा प्रकल्पः कागदावर असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘समन्यायी वाटपाचे कारण देऊन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे-जोवर भामा आसखेडचे पाणी येत नाही, तोवर दररोज पाणी मिळणार नाही!

Web Title: Thirsty pcmc citizens battle severe water crisis despite living in asias wealthiest hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Breaking News
  • Pimpri Chinchwad
  • pune news
  • Water Crisis

संबंधित बातम्या

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका
1

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
2

पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?
3

महाळुंगेतील भूखंड वाद तापला, दोन्ही बिल्डरांकडून परस्परांवर आरोप; नेमकं काय घडलं?

पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 
4

पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.