Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tanaji Sawant Son : तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता की अपहरण? सावंत यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली माहिती

शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 10, 2025 | 09:14 PM
तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता की अपहरण? तानाजी सावंत यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली माहिती

तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता की अपहरण? तानाजी सावंत यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली माहिती

Follow Us
Follow Us:

शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये तानाजी यांनी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

सायंकाळी पाचच्या सुमारात तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या सगळ्या प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी थेट पोलीस आयुक्तांचे कार्यालया गाठलं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. यानंतर तानाजी सावंत आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

“दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. त्यांची माहिती घेणे सुरू झाले असून ते पुण्यावरून विमानाने गेले आहेत. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडे या संदर्भातील तपास सोपवण्यात आला आहे. त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

“मुलगा बेपत्ता किंवा त्याचे अपहरण झाले आहे असं काहीही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी जवळपास जाणार असेल तरी मुलगा मी इथे जात आहे असं सांगतो. पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्याने मी अस्वस्थ झालो. याबाबत त्याने कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी १५ ते २० फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोन आलेला नाही. हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली. आता माहिती मिळत आहेत की ते विमानाने बाहेर गेले आहेत पण ते कुठे उतरणार आहेत याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. मुलाला जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो माघारी आला आणि त्याने माहिती दिली की मी त्या तिघांना एअरपोर्टला सोडून आलो. ते नेमके कुठे गेलेत हे काहीच माहिती नाही,” असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.

Web Title: Tanaji sawant son missing or kidnapped tanaji sawant gave information in press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • crime news
  • Kidnapping news
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.