पंढरपूर: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. एकीकडे शरद पवार स्वत: राज्यभरात दौरा करत आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावरच डाव टाकला आहे. रोहित पवार आणि तानाजी सावंत चे पुतणे अनिल सांवत यांची नुकतीच भेट झाली. त्यांच्या या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत. आहेत.
एकीकडे अनिल सावंत हे पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे अरण येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यांसारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी टीका केली होती. इतकेच नव्हे ततानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केलाय, तानाजी सावंत अत्यंत खोटारडा माणूस आहे. अशा लोकांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईल. आता त्यांच्या मतदारसंघात परिवर्तन निश्चित आहे. असेही रोहित पवारांनी म्हटले होते.
हेही वाचा: चेंबूरमध्ये आगीची भीषण घटना; एकाच कुटुंबातील सर्वांचा होरपळून दुर्देवी मृत्यू
अशातच हे आरोप प्रत्यारोप सुरू अतानाच अनिल सावंत यांनी रोहित पवारांची भेट झाली. त्यामुळे अनिल सावंत हे रोहित पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धक्कादायक म्हणजे अनिल सावंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बॅनर्सही मंगळवेढ्यात लावण्यात आले आहेत.
या बॅनर्सवर अनिल सावंतांचा भावी आमदार अशा आशयाचा मजकूर लिहीण्यात आला आहे. त्यामुळे अनिल सावंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनिल सावंतांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पण जर अनिल सांवतानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर हा तानाजी सावंतांसाठी मोठा धक्का मानला जाणार आहे.
हेही वाचा:धमाकेदार ऑफरसह 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे हा 5G स्मार्टफोन