Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टँकरचालक संपावर जाण्याच्या ‘त्या’ केवळ अफवाच; दुपारी पेट्रोल पंपावर तूफान गर्दी पण नंतर…

'हिट अँड रन' कायद्याविरोधात टँकरचालक पुन्हा संपावर जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरल्याने सोमवारी दुपारनंतर शहरातील पंपांवर वाहनधारकांची एकच गर्दी उसळली होती. तर सायंकाळपर्यंत शहरातील अनेक पंप बंद झाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2024 | 01:38 PM
टँकरचालक संपावर जाण्याच्या ‘त्या’ केवळ अफवाच; दुपारी पेट्रोल पंपावर तूफान गर्दी पण नंतर…
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : ‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात टँकरचालक पुन्हा संपावर जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरल्याने सोमवारी दुपारनंतर शहरातील पंपांवर वाहनधारकांची एकच गर्दी उसळली होती. तर सायंकाळपर्यंत शहरातील अनेक पंप बंद झाले होते. शहरात इंधन टंचाई जाणवणार नाही, संप वगैरे काही नाही, असे स्पष्टीकरण पुरवठा अधिकारी, डिलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. परिणामी, मंगळवारी सकाळपासून पंपावरील परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रिक्षा चालक, मालक संघटनेसह खासगी प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या विविध वाहनचालकांनी ९ जानेवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली. ९ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपासून संप सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाले आणि पुन्हा संप होणार असल्याचे पेट्रोल मिळणार नाही, अशी अफवा पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

वाहनधारक इंधन भरण्यासाठी पंपावर धडकले. परिणामी, अनेक पंपावर संध्याकाळपर्यंत ड्राय झाले. तर वाढलेली गर्दी, होणारे वाद टाळण्यासाठी अनेक डिलर्सनी इंधन विक्री बंद केली. मंगळवारी सकाळपासून मात्र सर्व परिस्थिती सुरळीत असल्याचे दिसून आले. शहरातील पंपावर तुरळक गर्दी दिसून आली.

वाहतूक सेनेचा निर्धार

महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने बुधवारी (दि.१०) सकाळी ११:३० वाजता बाबा पेट्रोलपंप येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक, भडकल गेटमार्गे विभागीय आयुक्तालयावर जाईल. या मोर्चात वाहन चालक, मालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी केले आहे.

Web Title: Tanker drivers going on strike rumours spreading rapidly nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • Hit and Run
  • maharashtra
  • Sambhaji nagar

संबंधित बातम्या

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
1

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
2

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
3

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
4

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.