Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’; नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तासगाव पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2025 | 05:30 PM
तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’; नागरिकांना केले 'हे' महत्वाचे आवाहन

तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’; नागरिकांना केले 'हे' महत्वाचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’
  • नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
तासगाव : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आशातच आता तासगाव नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तापलेली हवा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तासगाव पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.

शुक्रवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागांत ताफ्यासह पायी संचलन करत पोलिसांनी स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या मोहीमेचे मार्गदर्शन पोलिस उपाधीक्षक अशोक भवड यांनी केले. पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व १२ प्रभागांतील ३६ मतदान बूथचे निरीक्षण करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक काळात शांतता व सहकार्य राखण्याचे आवाहन केले. तासगाव नगरपरिषदमध्ये तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होत असताना, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरुवातीपासूनच पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहेत. संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच, निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची भूमिकाही पोलिसांनी स्पष्ट केली आहे.

नागरिकांनी कायद व सुव्यवस्था राखावी

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसंच सोशल मीडियावर अफवा पसरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तासगावचा निवडणूक रणसंग्राम तापत असताना, पोलिसांचा हा ‘वॉच’ शहरात सुरक्षिततेची हमी देणारा ठरत आहे.

Web Title: Tasgaon police have started planning strict security measures in the backdrop of the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Tasgaon News
  • Tasgaon Police

संबंधित बातम्या

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा
1

भाजप सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’, लोकशाही अन् संविधानाशी खेळलात तर…; सपकाळांचा इशारा

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार
2

जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल
3

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल
4

Purandar Airport : भूसंपादन संमतीचा दावा खरा की खोटा? विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनालाच सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.