
TB-Free District Campaign Launched by District Administration in Hingoli Nanded News Update
Hingoli News: हिंगोली : जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या “क्षयरोग मुक्त जिल्हा” अभियानाला गती देण्यासाठी सर्व ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो पूर्णपणे प्रतिबंधित व उपचारयोग्य आहे.
ग्रामपातळीवर यशस्वी मोहिमेची नोंद
शासनामार्फत यासाठी प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध असून, वेळेत निदान व उपचार घेतल्यास रुगण पूर्णपणे बरा होऊ शकतो. जिल्हह्यातील 304 ग्रामपंचायतींनी क्षयरोग मुक्ततेची घोषणा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले, क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करणे, संशयित रुग्णांची लवकर ओळख करून त्यांना उपचाराशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच रुग्णांनी किमान सहा महिन्यांचा उपचार पूर्ण करणे आवश्यक असून, उपचार अर्धवट सोडल्यास औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ग्रामपंचायती, आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी यांनी रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले. गावपातळीवर ग्रामसभांद्वारे जनजागृती, संशयित रुग्णांची माहिती तात्काळ आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविणे व रुग्णांना सामाजिक आधार देणे यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले, क्षयरोग रुग्णांबाबत भेदभाव न करता त्यांना सहकार्य करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांना थेट आव्हान; बारामती पोटनिवडणुकासाठी तीन उमेदवार रिंगणात
संशयित रुग्णांची लवकर ओळख आवश्यक
सध्या जिल्ह्यातील ३०४ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ४० ते ४५ टक्के प्रगती क्षयरोग मुक्ततेकडे झाली असून, चालू वर्षात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले की, “संपूर्ण भारतात 1 एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत क्षयरोग मुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रभावी प्रतिबंध, लवकर निदान व नियमित उपचार यावर भर देणे आवश्यक आहे. “माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेत जिल्द्वाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवावा,” असेही त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : राहुरीमध्ये पोटनिवडणुकीचे राजकारण! शिवाजी कार्डिलेंच्या जागेवर ‘या’ नेत्याला दिली BJPने उमेदवारी
राज्यस्तरावर ५ कोटी रुपयांच्या पारितोषिकाचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गावर अभियान जिल्ह्यात १ एप्रिल पासून राबविण्यात येणार आहे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव आरोग्य संपन्न गावर अभियान बाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी अणि निरोगी समाज निर्मितीसाठी ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्हात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.