
former MLA Shankar Anna Dhondge's entry into the Shiv Sena Nanded politics will change
Nanded Political News: जगदीश कदम : लोहा : लोहा-कंधार मतदारसंघातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून माजी आमदार व शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी २९ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला. या निर्णयामुळे मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. धोंडगे हे शेतकरी चळवळीतील लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखले जातात. (Political News)
शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्य करत त्यांनी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आणि आमदार म्हणून विविध विकासकामे राबवली. सिंचन प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव आणि लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी मतदारसंघातील शेतीला चालना दिली.
हे देखील वाचा : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका
अपेक्षा उंचावल्या
राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून महाराष्ट्रात शेतकरीहिताचे मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न केला. आता शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी ‘सतेचा उपयोग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करणार’ अशी भूमिका स्पष्ट केली आहे. या वेळी शिंदे यांनी धोंडगे याच्या कार्याचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचा विश्वास व्यक्त केला सताधारी पक्षात प्रवेशामुळे निधी उपलब्ध होऊन सिंचन, पायाभूत सुविधा आणि शेतीसंबंधित योजना अधिक वेगाने राबत्तील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘ताकद’ द्यावी
शंकरअण्णा हे शेतकरी चळवळीतील एक अभ्यासू नेते आहेत, त्यांनी राज्यभर शेतक-यांच्या प्रश्न घेवून शिवसेनेच्या माध्यमातून काम करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आगामी काळात शिवसेनेने शंकरअण्णांच्या पाठीशी ‘राजकीय ताकद’ उभी केली तर निश्चीतपणे शिवसेनेचा झंझावात नांदेड जिल्ह्यात निर्माण होईल, असा विश्वास धोंडगे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा : विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
शहराच्या सर्वागीण विकासाला गती देण्यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ अशोक चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाला. महायुती सत्तेनंतर जाहीर १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील ही पहिली वचनपूर्ती मानली जाते. कौठा येथील रविनगर भागात २४४७. पाणीपुरवठा योजनेचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला. अमृत २.० अंतर्गत २ कि.मी. जलवाहिनी टाकून १४१४ मालमत्तांना अल्ट्रासोनिक एएमआर मीटरद्वारे अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. ‘प्रत्येक घराला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणी देणे हे उद्दिष्ट आहे,’ असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.