
MP Gopchade Demands Holy City Status for Nanded Place of Great Significance to the Sikh
Nanded Political News : नांदेड : सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये नांदेड शहरासाठी आवाज उठवण्यात आला आहे. नांदेडला (Nanded News) होली सिटी म्हणून दर्जा देण्याची मागणी खासदार अजित गोपछडे यांनी केली आहे. अमृतसर-काशी धर्तीवर मानांकनाची मागणी करण्यात आली आहे. (Political News)
शिख धर्मीयांची ‘काशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड शहराला अमृतसर व काशीच्या धर्तीवर ‘होली सिटी’ घोषित करावे, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत शून्यकाळात केली. दहावे गुरू गुरु गोविंद सिंह यांच्या पावन स्मृतींनी नांदेड पवित्र झाले असून, येथेच ‘गुरु मानियो ग्रंथ’ ही ऐतिहासिक आज्ञा देण्यात आली होती. त्यामुळे या शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ‘होल सिटी’ दर्जासोबतच स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांना थेट आव्हान; बारामती पोटनिवडणुकासाठी तीन उमेदवार रिंगणात
वाहतूक व आरोग्य सुविधा मजबूत करण्याची मागणी
भाविकांसह स्थानिक नागरिकासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य आणि निवासाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेडला एआय व आयटी हब म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडताना, युवकांसाठी रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला. आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी एम्ससह सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी त्यांनी केली. वाहतूक सुविधांच्या दृष्टीने अमृतसर-नांदेड, नांदेड-पुणे आणि नांदेड-हैदराबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी मेगा पलायओव्हर्स, रिंग रोड प्रकल्प आणि नियोजित मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नांदेडमध्ये डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. या सर्व उपाययोजनांमुळे नांदेडचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाला कुठे बदली मिळाली?
जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
जिल्ह्यात सोमवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शहरांसह ग्रामीण भागाला चांगलाच तडाखा दिला. रात्री सुमारे १० वाजण्याच्च्या सुमारास वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली, तर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. हिमायतनगर, हदगाव, उमरी, अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यांसह जिल्ह्यातील इतर भागांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३० व ३१ मार्च तसेच १ व ३ एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.