Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET परीक्षेच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा

येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 12:32 PM
मोठी बातमी ! TET परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष...

मोठी बातमी ! TET परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; राज्यातील तब्बल 4 लाख उमेदवारांचे लागले लक्ष...

Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, सर्व मनपा, खाजगी उच्च माध्यमिक, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. टीईटी परीक्षेत संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही. १५ मार्च २०२४ या संचमान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षण सेवकपद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांवर संघटना बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात उतरावे, असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : महा TET परीक्षा झाली सुरळीत! ‘या’ दोन केंद्रावर आठ उमेदवारांची हकालपट्टी, पारदर्शकतेवर भर

यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, सभाध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर निर्मळे, प्रसाद पाटील, विलास पिंगळे, बाबा पाटील सचिव आर. वाय. पाटील, भरत रसाळे, जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४४६७३० परीक्षार्थींनी दिली परीक्षा 

राज्यभरात २३ नोव्हेंबर रोजी TET (Teacher Eligibility Test) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. ३७ जिल्ह्यातील एकूण १,४२३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित केली गेली. त्यात ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० परीक्षार्थी उपस्थित होते. एकंदरीत, या परीक्षेत ९३.९१% उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली होती.

हेदेखील वाचा : Maharashtra News : शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांची तपासणी; ५०६२ उमेदवारांची उपस्थिती तर २४६ अनुपस्थित

Web Title: Teachers union aggressive against tet exam a march will be taken out on december 5th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Education Sector
  • Maharashtra Education
  • Teacher Exam
  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.