१. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
२. राज्यात शिंदेंच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहेत.
३. महाविकास आघाडी आणि महायुती निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात कधीही काही घडू शकते. गेल्या दोन ते तीन वर्षांत आपल्याला ते पाहायला मिळाले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निववडणुका होणार आहेत. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी आगामी निवडणुकांची जोरदार तयारी करत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देताना पाहायला मिळत आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करत आहेत. संपूर्ण राज्यभरातून अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. मात्र तेजस ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे आता राजकारणात चर्चा सुरु आहे.
तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तेजस ठाकरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का जिल्ह्यात बसला ते. तेजस ठाकरे यांचे नाव ऐकताच पक्षप्रवेशावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र शिवसेनेत प्रवेश केलेले तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुत्र नसून, तेजस गविंद ठाकरे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तेजस गोविंद ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी असल्याचे म्हटले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधीच ठाकरेंच्या पक्षाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.
येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. टप्प्याटप्प्याने या निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुती एकत्रितपणे या निवडणूका लढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी महायुती नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असे म्हटले जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक कार्यकरते त्यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्य्यात जोरदार लढत पाटील मिळू शकते. विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही लढत पाहायला मिळू शकते.