Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नदीपात्रातील पाणी उपसाबंदीला तात्पुरती शिथिलता; बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस होऊन बहुतांश धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, जलसंपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या अखेरीस धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 08:37 AM
नदीपात्रातील पाणी उपसाबंदीला तात्पुरती शिथिलता; बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

नदीपात्रातील पाणी उपसाबंदीला तात्पुरती शिथिलता; बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Follow Us
Follow Us:

कराड : जिल्ह्यातील नद्यांवरील पाणी उपसाबंदीच्या आदेशामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने नदीपात्रातील पाणी उपसाबंदीच्या आदेशात तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, कुडाळी, वेण्णा, वांग आणि उत्तरमांड या नद्यांवरील उपसाबंदी २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस होऊन बहुतांश धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, जलसंपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या अखेरीस धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. परिणामी, कृषी पंपधारक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते.

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखाना पुरस्कृत विविध सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, कार्यकारी अभियंता प्रगती यादव तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांच्याकडे निवेदन सादर करून बंदी आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…

यानंतर सातारा पाटबंधारे विभागाने हा प्रस्ताव मुख्य अभियंता, कोल्हापूर यांच्याकडे निर्णयासाठी पाठवला होता. त्यावर वरिष्ठ स्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर सहाय्यक अधीक्षक अभियंता, सातारा यांनी २२ जून रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून उपसाबंदी शिथिल करण्याचे आदेश दिले.

हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

या निर्णयामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पाणी उपसाबंदी शिथिल करण्याच्या निर्णयानंतर शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले जात आहे.

पाणीबंदीविरोधात कराडात शेतकऱ्यांचा एल्गार; कराड तहसील कार्यालयासमोर निदर्शने, उपसा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन

Web Title: Temporary relaxation of restrictions on water extraction from the riverbed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • balasaheb patil
  • Karad news

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
2

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.