(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
मंदिर का गायब होतो?
स्तंभेश्वर महादेव मंदिराला लोक गायब मंदिर या नावानेही ओळखतात. पाण्यात बुडण्याच्या सवयीमुळे या मंदिराला हे नाव मिळाले आहे. मंदिराची खासियत हिच आहे की पाण्याच्या लहरींमध्ये ते दिवसातून दोनदा पाण्याखाली जाते आणि मग काही तासाने पुन्हा पाण्यावर तरंगताना दिसते. यावेळी मंदिराच्या भिंती, स्तंभ आणि गर्भगृहसुद्धा पाण्याखाली जातात, फक्त काही वेळा शिवलिंगच दिसत असते.
भरती-ओहोटीचे विशेष महत्त्व
या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचे असल्यास भाविकांनी भरती-ओहोटीच्या वेळेवर खास लक्ष ठेवावे लागते. कारण जेव्हा भरती येते तेव्हा मंदिर पूर्णपणे पाण्यात डुबते आणि ओहोटी येते तेव्हा मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. यामुळेच भरती-ओहोटीच्या वेळी मंदिराचे अद्भूत दृष्य पाहण्यासाठी लोक भरतीच्या काही तास आधी येथे येतात. या मंदिराला फक्त ओहोटीच्या वेळीच भेट देता येते.
मंदिराची पाैराणिक कथा
काही पाैराणिक मान्यतांनुसार, भगवान कार्तिकेयने राक्षस तारकासुराचा वध केल्यानंतर आत्मिक शांतीसाठी तीन शिवलिंग स्थापित केले. असे मानले जाते की, स्तंभेश्वर महादेव मंदिर देखील त्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. हेच कारण आहे की इथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लोक दूरदूरवरुन कंबोई गावाला भेट देतात. असं म्हणतात की, मनापासून मागितलेली इच्छा इथे पूर्ण होते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिरात अभिषेकासाठी दूधाचा नाही तर मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो.
मंदिराला कशी भेट द्यायची?
स्तंभेश्वर महादेव मंदिर वडोदरापासून ७५ किमी अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे, खासगी गाडी किंवा विमान प्रवासाने वडोदराला पोहचू शकता. इथून बस किंवा टॅक्सी करुन तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता. पण भेट देण्यासाठी भरती-ओहोटीची वेळ पाहून मग मंदिराला भेट द्या.






