
२३ नोव्हेंबर रोजी काच दिवशी होणार टीईटी परीक्षा
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दिव्यांग बांधवांसाठी विशेष अशी बैठक व्यवस्था करण्याची मागणी
सोनाजी गाढवे/पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यंदा २३ नोव्हेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. यावेळी परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याच बरोबर दिव्यांग बांधवांसाठी विशेष अशी बैठक व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना महाराष्ट्र संघटनेने केली
राज्यभरातील हजारो परीक्षा केंद्रावर प्रवेश करतानाच कागदपत्रे व ओळखपत्र तपासणीबरोबर चेहरामोळख पडताळणी करूनच प्रवेश दिला जाईल. या सर्व उपाययोजनांमागचा उद्देश म्हणजे परीक्षेत गैरप्रकार, बनावट उमेदवार, किंवा गटबाजी टाळणे असा आहे. राज्य परीक्षा परिषदेने यावर्षी सुरक्षेची काटेकोर तयारी केली असून, सर्व केंद्रप्रमुखांना याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन शिक्षक भरतीसाठी तसेच सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी पात्रता बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीला पाच वर्षे बाकी असलेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशा शिक्षकांची संख्या राज्यभरात सुमारे ६० हजारांहून अधिक आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
टिईटी परीक्षासाठी विकलांग व अंध दिव्यांग बांधवांना मदतनीस म्हणून एमपीएससी किंवा राज्यसेवा च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना न देता त्यांना मदत म्हणून पदवीधर उमेदवारांना उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी जोर धरत आहे जेणे करून इतर उमेदवारावर अन्याय होणार नाही.
राज्यात जवळपास ५ लाख पेक्षा जास्त उमेदवार देणार परीक्षा
अनेक उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. पेपर क्र. एक व दोन एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. यंदा परीक्षार्थीची संख्या वाढली आहे, परीक्षेला डी.एड., बी.एड. धारकांसह कार्यरत शिक्षकही असून नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संख्या वाढल्याची चर्चा आहे. टीईटी परीक्षेसंदर्भात मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
घोटाळ्याची पुनरावृत्ती नको
२०२९-२२ मध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांची टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी झालेल्या चौकशीत त्यावेळच्या अधिकाऱ्यांना अटकही केली टीईटी घोटाळा समोर आल्याने होती. आता या घटनेची पुनरावृत्ती नको, म्हणून अधिक कडक उपाययोजना परीक्षेत केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
टीईटी शिवाय पदोन्नती नाहीच
टीईटी अनिवार्य केल्याने शिक्षकांची पदोन्नती देखील त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र ठरवले असले, तरी त्यांना टीईटी पात्र असणे आवश्यक आहे. यामुळे यंदा टीईटीला बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
राज्यात प्रथमच भावी शिक्षकासोबत विद्यमान शिक्षक ही देणार टीईटी परीक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पदोन्नतीसाठी व उर्वरित सेवा वाचवण्यासाठी हजारो शिक्षक सुद्धा टीईटी परीक्षा देणार असून ही परीक्षा पारदर्शक व गतिमान स्वरूपात पार पडली गेली पाहिजे आणि ४० दिवसांच्या आत परीक्षा ची सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करून अंतिम यादी जाहीर करावी.टीईटी परीक्षेसाठी दिव्यांग बांधवांसाठी विशेष अशी बैठक व्यवस्था करावी अशी शासनाकडे आमची मागणी आहे.
‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
-प्रशांत शिरगुर राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना महाराष्ट्र.
राज्यात नोंव्हेबरला टिईटी परीक्षा होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेशांच आम्ही नक्कीच स्वागत करतो. पण आज २० ते ३० वर्षे अध्यापन करून सुद्धा परत पात्रता सिद्ध का करावा. आणि राज्यात टिईटी २०१३ पासून लागू आहे त्यानुसार २०१३ पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षातून सूट द्यावी अशी आमची मागणी आहे आणि येत्या काळात टीईटी बंधनकारक नको यासाठी मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.
-प्रा डॉ बापुसाहेब अडसूळ प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य.