
Thackeray Brother Alliance Announcement:
Thackeray Brother Alliance Announcement: गेल्या काही काळापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मनसे-ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. उद्या (२३ डिसेंबर) मनसे-ठाकरे सेना युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या युतीची अधिकृत घोषणा करतील. याशिवाय जागावाटपाबाबत असलेला गोंधळही दूर करण्यात आला असून उमेदवारांची नावेही ठरवली जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून उद्याच उमेदवारांची नावे जाहीर होऊ शकतात.
मराठी-हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू आता महापालिका निवडणुकांच्या रिंगणात एकत्र येणार आहेत. युतीच्या घोषणेसाठी दोन्ही ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेतील. वरळीतील NSCI डोममध्ये ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेमध्येच ते युतीबाबत मोठी घोषणा होऊ शकते. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर आज सुटण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मातोश्री’वर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या दोन्ही बैठकींत युतीबाबत आणि जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. उद्या होणाऱ्या युतीच्या अधिकृत घोषणेदरम्यान कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, याचाही खुलासा केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वांनाच उत्सुकता होती, तो निर्णायक दिवस अखेर जवळ आला आहे.
Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…
दरम्यान, २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी मनसे–शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होणार असून, सर्व महानगरपालिकांबाबतची युती एकाच वेळी जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. आता उद्या युती जाहीर होताच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांमधून शिवसेना (ठाकरे गट)ची एकूण कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिल्याचे चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले असले, तरी राज्यव्यापी पातळीवर पाहता ठाकरे गटाला मोठी झेप घेता आली नसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Maharashtra Local Body Election)
तज्ज्ञांच्या मते, ठाकरे गटाने या निवडणुकांसाठी फारशी आक्रमक भूमिका घेतलेली दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेतेदेखील प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचाराची धार कमी पडली, त्यातच अनेक ठिकाणी पक्ष संघटन कमकुवत असल्याचेही या निकालांतून समोर आले.
कर्नाटकमध्ये केवळ इडली डोसाचं नाहीतर तर ‘हे’ पदार्थ सुद्धा आहेत खूप फेमस, चव चखताचं मिळेल स्वर्ग सुख
मुंबई वगळता इतर शहरी भागांमध्ये ठाकरे गटाचा फारसा प्रभावही दिसून आला नाही. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नगरपरिषदांमध्ये पक्षाला यश मिळाले असले, तरी ते अपवादात्मक ठरले. बहुतेक ठिकाणी महायुती किंवा भाजप समर्थित उमेदवारांनी बाजी मारली.
बहुतांश ठिकाणी ठाकरे गटाने एकटे लढण्याचा निर्णय घेतला. मनसे, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत आघाडी न झाल्याचा फटका अनेक ठिकाणी बसल्याचे दिसते. मतविभाजनामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याशिवाय ज्या- ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रभावी नेते आणि मजबूत संघटना होती केवळ त्याच ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळाले.